Saturday , March 15 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूर नगरपंचायतीत सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीत बेळगांव पदवीधर मतदारसंघाचे आमदार हणमंत निराणी यांच्याकडून खानापूर नगरपंचायत व तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना कोरोना प्रतिबंधक औषध फवारणीसाठी ८०० लिटरचे सोडियम क्लोराइड नगरपंचायतीत नुकताच वाटप केले.यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने याना खानापूर शहरासाठी १०० लिटर सोडियम क्लोराइडचे वाटप करण्यात आले.तसेच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना ७०० …

Read More »

खानापूर – जांबोटी क्राॅसवर खोकी हटाव मोहिम

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवर गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत असलेल्या खोकीधारकाना नगरपंचायतीकडून खोकी हटवण्यासाठी नोटीसा पाठविली होती. सध्या जत – जांबोटी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करून रविवारीच खोकी हटाव मोहिमेला सुरूवात झाली.जांबोटी क्राॅसवर जवळपास १०० अधिक खोकीधारक आपला व्यवसाय करून …

Read More »

विकेंड लॉकडाऊन संपल्यावर बेळगावात पुन्हा गर्दी

बेळगाव : २ दिवसांचा संपूर्ण कडक विकेंड लॉकडाऊन संपल्यावर सोमवारी बेळगावकरांनी पुन्हा बाजारात, रस्त्यांवर गर्दी केली. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती गर्दीबाबत निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.कोरोनाची दुसरी भयंकर लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने ७ मेपर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. याच दरम्यान जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी शनिवार व …

Read More »

वडगाव यरमाळ रस्त्यावरील वीजखांब, डीपी धोकादायक स्थितीत

बेळगाव : वडगावातील यरमाळ रस्त्यालगत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील वीजखांब आणि त्यावरील डीपी खराब झाले असून, अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्यावरील वीजवाहक तारा तुटून इतक्या खाली आल्या आहेत की, जाणा–येणाऱ्यांच्या हाताला सहज स्पर्श होऊ शकतो. पाऊस-वाऱ्यामुळे काही तारा खांबांना जाऊन चिकटल्या आहेत. त्यामुळे कोणाचा चुकून जरी खांबाला स्पर्श …

Read More »

बेळगाव टॅक्सी असोसिएशनच्या ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण

बेळगाव : कोरोना काळात रुग्णांना इस्पितळात दाखल करणे आणि इस्पितळातून घरी नेणे सोपे व्हावे यासाठी बेळगाव टॅक्सी असोसिएशनने ऍम्ब्युलन्स सेवा सुरु केली आहे. सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदुम यांच्याहस्ते ही रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.सध्या कोरोना रुग्णांचे आणि कोरोनाबळींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे आणि …

Read More »

मॉन्सून लांबला!

पुणे : चार दिवसांपूर्वी अंदमानमध्ये जोरदार प्रवेशानंतर वेगाने भारताकडे कूच करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वारे मंदावल्याने मॉन्सूनचा पाऊस लांबला आहे. सध्या या वाऱ्याला पुढे येण्यास पोषक स्थिती नसल्याने मान्सूनला खीळ बसली आहे. परिणामी १ जून रोजी केरळमध्ये येणारा मॉन्सून ३ जूनपर्यंत लांबणार आहे.अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर मोसमी वारे सक्रीय …

Read More »

मोदींनी देशाची संस्कृती जगासमोर आणली : मंत्री जगदीश शेट्टर

हुबळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारने देशातील जनतेला सुरक्षा पुरविण्याचे काम केले आहे. मोदीजींनी देशाची संस्कृती जगापर्यंत पोचविली आहे.  “मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या सुशासनसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो,” असे मंत्री जगदीश शेट्टर म्हणाले.मंत्री जगदीश शेट्टर यांनी हुबळी शहरातील माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात कोरोना कमी होत …

Read More »

राज्यात लॉकडाऊन वाढीसंदर्भात तांत्रिक सल्लागार समितीकडून कोणतीही शिफारस नाही : मुख्यमंत्री येडियुराप्पा

बेंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी रविवारी येथे सांगितले की, कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने लॉकडाऊन वाढीसंदर्भात कोणतीही शिफारस केली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान राज्यात कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन कायम ठेवण्यावर विचार सुरु आहे.दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी, कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन वाढविण्याच्या …

Read More »

‘माझी सेवा’ अंतर्गत अम्ब्युलन्स व 10 ऑक्सिजन सिलेंडर कॉन्सन्ट्रेशन, भाजपचा उपक्रम

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव यांच्यावतीने नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षाचा कालावधी यशस्वी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘माझी सेवा’ अंतर्गत अम्ब्युलन्स व 10 ऑक्सिजन सिलेंडर कॉन्सन्ट्रेशन भाजपचे राज्य उपाध्यक्ष श्री. विजयेंद्र येडीयुरप्पा यांनी जाहीर केलेल्या मदतीतून देण्याचा उपक्रम रविवार दुपारी बारा वाजता बेळगाव लोकसभा खासदार मंगला अंगडी यांच्या उपस्थितीत पार …

Read More »

बालक जागृती अभियानात शिक्षकांनी सहभागी होऊन भावी पिढी वाचण्यासाठी प्रयत्न करावेत :
पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या योजनेची सुरवात तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ञानी वर्तवला आहे. तिसऱ्या लाटेची मुलांच्या व पालकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे. ती भीती कमी करण्यासाठी कोरोना बालक जागृती अभियान २०२१ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. …

Read More »