तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बालपणापासून संगीत क्षेत्रात उत्तुंग असे कार्य केलेल्या समृद्ध राजाराम कांबळे (मूळगाव कोरज, ता. चंदगड) सद्या राहणार नेसरी याचा सत्कार चंदगड तालुक्याचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. चंदगडी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात हा गौरव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर सन्मान संगीत कार्यातील …
Read More »फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार बहूजनांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात : प्रा. निरंजन फरांदे
कोल्हापूर (जिमाका) : फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित असणारा आदर्श समाज घडवायचा असेल तर आज महिला तसेच युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारच बहूजनांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात, असे प्रतिपादन सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्रा. निरंजन फरांदे यांनी केले. सामाजिक …
Read More »शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांना तब्बल सोळा वर्षानंतर जामीन
बेळगाव : 2006 मध्ये खानापूर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांना तब्बल सोळा वर्षानंतर या गुन्ह्यामध्ये जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात हजर राहण्यासाठी रामदास कदम सोमवारी बेळगावला आले होते. 2006 साली झालेल्या खानापूर मधल्या मेळाव्यात शिवसेनेचे माजी मंत्री …
Read More »बसस्थानक परिसरात आता केवळ प्रिपेड रिक्षा : आमदार अनिल बेनके
बेळगाव : बेळगावचे मध्यवर्ती आणि सीबीटी बसस्थानक परिसरात केवळ प्रिपेड ऑटोरिक्षा स्टँड असणार आहे. सर्व रिक्षांनी प्रिपेड स्टॅंडमध्येच नंबर लावावा. कोणत्याही खाजगी ऑटो स्टँडला इथे परवानगी दिली जाणार नाही, असं स्पष्टीकरण उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला. सोमवारी सकाळी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, उत्तरचे रहदारी …
Read More »माजी सैनिक मल्टी-पर्पज को-ऑप. सोसायटी खानापूरचा 12वा वर्धापन दिन साजरा
खानापूर : माजी सैनिक मल्टी-पर्पज को-ऑप. सोसायटी लि. खानापूरचा 12वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन जयराम पु. पाटील व संचालक मंडळ यांच्याहस्ते केक कापून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून खानापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना डॉ. नारायण साहेब, चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच संचालक …
Read More »शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : सिल्वर ओक या मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहरातील विविध संघटनांनी पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. शरद पवार यांच्या मुंबईवर झालेल्या घरावर झालेला हल्ला हा सुनियोजित होता. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याकरिता बेळगाव राष्ट्रवादी काँग्रेस, समिती आणि …
Read More »परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशाचे नेतृत्व समर्थ : शायना एन. सी. यांचा विश्वास
बेळगाव : युक्रेन- रशिया युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थिती मुळे जागतिक स्तरावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा वेळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या देशाचे नेतृत्व समर्थ असल्याचा विश्वास, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी बोलताना व्यक्त केला. शायना एन. सी. या जायंटस भवन …
Read More »इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून
इचलकरंजी : शहरातील वखार भाग येथे उदय मधुकर गवळी (वय 40, रा. रेणुका नगर झोपडपट्टी) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्जनस्थळी डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. वखार भाग येथे मोहन मोहन आर्केडच्या पाठीमागे पडीक …
Read More »खानापूरातील रक्तदान शिबीरात 50 जणांचा सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील श्री ज्योतिर्लिंग सर्वागिण विकास संघाच्या दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधुन फिटनेस क्लब खानापूर व पाटील गार्डन करंबळ क्रॉस यांच्या सौजन्याने आरोग्य भारती याच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान विषयी जागृती व्हावी म्हणून रविवारी दि. 10 रोजी येथील पाटील गार्डनमध्ये आयोजित रक्तदान शिबीरात जवळपास 50 जणांचा सहभाग होता. …
Read More »पिण्याचे, सिंचनाचे पाणी पुरवण्यास सरकारचे प्राधान्य : मंत्री जे. सी. माधुस्वामी
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील कोडनी गावात चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल वजा बंधार्याचे लघु पाटबंधारे आणि संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी उद्घाटन केले. लघु पाटबंधारे आणि अंतर्जल विकास खात्यातर्फे बुदीहाळ गावात वेदगंगा नदीवर आणि चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल वजा बंधार्याचे रविवारी लघु पाटबंधारे आणि संसदीय व्यवहार मंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta