Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

नागुर्डा-वाडा येथे संगीत भजनी स्पर्धा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : परितोषक दवारकरी संप्रदाय समाजातील चातुर्वर्ण्य संस्कार नाकारणारा असून समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा मार्ग आहे. या संप्रदायांने आजवर समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी, भेदभाव, जातीयता, अंधश्रद्धा लाथाडून सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला आहे, असे विचार निरंजन सरदेसाई यांनी व्यक्त केले. नागुर्डा-वाडा(ता. खानापूर) येथे नुकताच संगीत भजनी …

Read More »

चिगुळे ग्रामस्थांचे तहसीलदाराना निवेदनाव्दारे १७ जणांवर कारवाईची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील चिगुळे येथील माऊली सेवा समितीच्या सदस्याना चिगुळेतील काही नागरिक धमकावुन गावात दहशत घालत आहेत. मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव करत आहेत. अशा चिगुळेतील १७ जणांवर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन व सीपीआय सुरेश सिंगे याना नुकतेच देण्यात आले. निवदेनात म्हटले आहे की, …

Read More »

सौंदलगा येथे ऐतिहासिक बुरुज संवर्धनासाठी युवकांकडून प्राधान्य

सौदलगा : सौंदलगा येथे ऐतिहासिक बुरुजाचे संवर्धन करण्यासाठी युवक वर्गाकडून प्राधान्य, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कामास सुरुवात. गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. सौंदलगा येथे भुईकोट किल्ला होता त्या किल्ल्याची पडझड झाली असून इतिहासाचा शेवटचा दुवा म्हणून एक बुरूज उभा आहे.त्या बुरुजाचे संवर्धन करणे व इतिहासाचा अमोल ठेवा जतन करणे सौंदलग्यातील युवावर्गाने ठरवले …

Read More »

भाजपा ग्रामीणच्यावतीने बसुर्ते मराठी प्राथमिक शाळेला ग्रीन बोर्ड वितरण

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने बसुर्ते येथे सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 4ु10 फुटाचे 7 ग्रीन बोर्ड वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा ग्रामीण मंडळाच्या वतीने 60 गावांतील 400 वर्ग खोल्यांना ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. विधानपरिषद सदस्य …

Read More »

बेळगाव आयुक्तालयात 10172 कोटी रुपये जीएसटी संकलन

बेळगाव : केंद्रीय जीएसटी बेळगाव आयुक्तालयाने 2021-22 या आर्थिक वर्षात 10172 कोटी रुपये इतके विक्रमी जीएसटी संकलन केले आहे अशी माहिती बेळगावचे जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी दिली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी म्हटले आहे की, इतके विक्रमी जीएसटी कर संकलन हे …

Read More »

कोगनोळी येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न

कोगनोळी : येथील भगवा चौक येथे असणार्‍या पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना युवराज पाटील म्हणाले, समस्त हिंदू धर्मीयांच्या वतीने 3 मार्च ते 1 एप्रिल (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर छत्रपती …

Read More »

टोल दरवाढीचा वाहनधारकांना भुर्दंड

कोगनोळी : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने शुक्रवार तारीख १ च्या मध्यरात्रीपासून टोल दर वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली असून टोल दरवाढीचा वाहनधारकांना मोठा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाक्यावर येणाऱ्या …

Read More »

सिंगीनकोप शाळेत विद्यार्थ्यांना निरोप

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इदलहोंड केंद्राचे सीआरपी गोविंद पाटील, सिंगीनकोप ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, तसेच …

Read More »

संकेश्वर “एआयएमआर” विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी..

संकेश्वर (प्रतिनिधी) : सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन महोत्सवात संकेश्वर अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, विद्यार्थ्यांनी विविध पारितोषिके जिंकून घवघवीत यश संपादन केले. मिस. किरण पाटील हिने प्रकल्प प्रस्ताव लेखनात प्रथम पारितोषिक पटकाविले. मिस. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली पूजा माळी, शिवानी राठोड आणि कावेरी सुतार यांनी बिझनेस …

Read More »

संकेश्वरात “वॉकर्स वे”ची संजय नष्टी यांना श्रद्धांजली

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे धडाडी नगरसेवक लढवय्या नेते संजय दुंडापण्णा नष्टी यांच्या अकालीक निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन संकेश्वर वॉकर्स वे सदस्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना वॉकर्स वे फ्रेंडसचे किरण किंवडा म्हणाले संजय नष्टी हे संकेश्वरच्या सर्व २३ प्रभागाच्या विकासासाठी झटणारे धडाडीचे नगरसेवक होते. त्यांना सर्व प्रभागांची काळजी असायची संकेश्वर …

Read More »