Thursday , March 5 2026
Breaking News

Belgaum Varta

पारीश्वाड येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : पारीश्वाड (ता. खानापूर) येथे बुधवारी दि. 27 रोजी सकाळी शिशू अभिवृद्धी योजना खानापूर मलप्रभा स्त्रि शक्ती स्वसहाय्य संघ बँक सोसायटी खानापूर, पारीश्वाड ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर राष्ट्रिय महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्ति समावेश कार्यक्रम सरकारी हायर प्रायमरी शाळा पारीश्वाड येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमात पौष्टीक …

Read More »

कुंतिनाथ कलमणी यांना प्रभातकार वा. रा कोठारी पुरस्कार

बेळगाव : दर तीन वर्षांनी दक्षिण भारत जैन सभेचा वतीने देण्यात येणारे प्रभातकार वा. रा कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हळीय संदेश कन्नड वृत्तपत्राचे संपादक कुंतीनाथ कलमणी याना घोषित केले आहे अलीकडे सांगली यथे दक्षिण भारत जैन सभेचा अद्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांचा अध्यक्षाखाली झालेला निवड समिती …

Read More »

कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी 13 मेपासून बेमुदत संपावर

कोल्हापूर : कोरोना कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांनी विविध 22 प्रलंबित मागण्यांसाठी 13 मेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वारंवार चर्चा करूनही प्रश्न सुटत नसल्याने महापालिका कर्मचारी संघाने मंगळवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यासंदर्भात नोटीस दिली असून 12 मे रोजी मध्यरात्री बारापासून संपावर जाणार …

Read More »

रथ ओढताना विजेचा धक्का; १० भाविकांचा मृत्यू, १५ जखमी

चेन्नई : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात उत्सवादरम्यान भाविकांना विजेचा धक्का बसला. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले. भाविक मंदिराच्या रथाला ओढत असताना विजेची तार अडकली. यामध्ये दोन लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या तंजावार जिल्ह्यात भगवान अय्यपाचा उत्सव म्हणजे ९४ वा अप्पर गुरुपूजा उत्सव २६ एप्रिलला मंगळवारी रात्री …

Read More »

छत्रपती शाहू महाराजांच्या कलेचा वारसा वृद्धींगत व्हावा : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. त्यांनी वेगवेगळ्या कलांना, कलावंताना प्रोत्साहन दिले.  छ. शाहू महाराजांच्या कलेचा वारसा अधिकाधिक वृद्धींगत व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या, ‘ …

Read More »

कोगनोळीजवळ ट्रकची विद्युत खांबाला धडक

सुदैवाने जीवित हानी नाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर डिव्हायडरच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबाला ट्रकची धडक बसण्याची घटना मंगळवार तारीख 26 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारा ट्रक येथील कोगनोळी फाट्यावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाच्या …

Read More »

….तर सीमावर्ती जिल्ह्यात पुन्हा पाळत

मुख्यमंत्री बोम्मई, नियमांचे पालन करण्याचे आवाहन बंगळूर : देशाच्या विविध भागांमध्ये कोविड- १९ च्या ताज्या चिंता आणि साथीच्या संभाव्य चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या सल्ल्यानुसार राज्याच्या विमानतळांवर आणि सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये खबरदारी आणि पाळत ठेवण्याचे उपाय पुन्हा सुरू केले जातील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सूचित …

Read More »

श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर राजवाड्यात देव बोलवण्याचा कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये सौंदत्ती येथे रेणुका देवीचा जग, महादेवाची कावड श्रीशैल आंध्र प्रदेश इथून व श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे निपाणकर यांच्या मानाची काठी व पालखी, जोतिबाची मानाची काठी जाऊन आल्यावर सर्व देव-देवतांना एकत्र बोलवायचा कार्यक्रम राजवाडामध्ये झाला. त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची

युवा नेते उत्तम पाटील : आर. ए. पाटील पब्लिक शाळेचे स्नेहसंमेलन निपाणी (वार्ता) : कोरोना नंतरच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे मुलांच्या जडणघडणीत मोठा बदल दिसून येत आहे. मोबाईल अति वापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठविले की आपली जबाबदारी संपली नसून मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे …

Read More »

‘खेलो इंडिया’ मध्ये अक्षताची सुवर्ण पदकाची हॅट्ट्रिक!

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हालगा गावची होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने बेंगलोर येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील ‘2 ऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021’ क्रीडा महोत्सवामध्ये आज मंगळवारी वेटलिफ्टिंगच्या स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक हस्तगत केले आहे. या पद्धतीने अक्षताने सलग तिसऱ्यांदा खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण …

Read More »