बेळगाव : महिलांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता या ध्येयाने राज्यभरात आज ‘अक्का पथक’ या विशेष मोहिमेचा बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते अधिकृत शुभारंभ करण्यात आला. कर्नाटकच्या ३१ जिल्ह्यांत आणि ५ पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात हे पथक कार्यरत राहणार आहे. महिला व बालविकास विभाग …
Read More »एडीजीपी आलोक कुमार यांची हिंडलगा कारागृहात अचानक भेट
बेळगाव : बेळगाव येथील ऐतिहासिक हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात एडीजीपी आलोक कुमार यांनी अनपेक्षित भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिस्तभंगाचा इशारा दिला आहे. कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे राज्य पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी मंगळवारी बेळगाव तालुक्यातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला …
Read More »शतकोत्तर वर्षाची परंपरा लाभलेला निपाणीतील महादेवाचा रथोत्सव
शतकोत्तर परंपरा लाभलेल्या निपाणी शहराचे दैवत महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येथील रथोत्सव महाशिवरात्रीचे खास आकर्षण आहे. यंदा बुधवारी (ता.१८) महादेवाचा ऐतिहासिक रथोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त… गजेंद्र तारळे, महादेवाचे भक्त, निपाणी निपाणी नगरीची स्थापना श्रीमंत सिद्धोजीराजे देसाई निपाणकर सरकार यांनी केली. त्यांच्या कारकिर्दीतच …
Read More »मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल : सीमाकवी रवींद्र पाटील
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व बस्तवाड हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न बेळगाव (प्रतिनिधी) : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व मराठा मंडळचे बस्तवाड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला …
Read More »“गुणांसह गुणवंत व्हा; संस्कार हा भक्कम जीवनाचा पाया!” : सीमाकवी रवींद्र पाटील
संत तुकाराम विद्यालय सुंडी येथे दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात शिनोळी (प्रतिनिधी) : द.म.शि मंडळ संचलित संत तुकाराम विद्यालय सुंडी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक सीमाकवी रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळवण्यापेक्षा गुणवंत …
Read More »कवी संमेलन म्हणजे निव्वळ भावना….
बेंगळुरू : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील राजधानी बेंगळूरू येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अतिशय उत्साहाने साहित्यिक कार्यक्रम करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या कवितेची साद घालत कार्यक्रमाची सुरवात कवी संमेलनापासून झाली. कवींना एका सूत्रात बांधायचे कार्य ‘श्वेतुष'(तुषार …
Read More »“१५ वर्षांची जट कापून अंधश्रद्धेला छेद; कागवाडमध्ये परिवर्तनाची नवी पहाट”
कागवाड येथे जटा निर्मूलनाचा यशस्वी उपक्रम; सामाजिक जागृतीचा आदर्श कागवाड / प्रतिनिधी : कागवाड (कर्नाटक) येथे सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दर्शवणारा जटा निर्मूलनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आज यशस्वीरित्या पार पडला. सौ. कमल आण्णाप्पा वाघमोरे या देवदासी मावशींची तब्बल १५ वर्षांपासून वाढत गेलेली सुमारे ६ फूट लांबीची आणि अंदाजे ६ किलो …
Read More »शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल : डॉ. आनंद पाटील
कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार निपाणी (वार्ता) : शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून संबोधले जाते. पण निसर्गाचा लहरीपणा शासनाच्या आडमुठे धोरण अशा विविध कारणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यामुळे देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे अवलंबणे आवश्यक आहे. शेतकरी सुखी झाल्यास देशही सुखी बनेल, असे मत …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त निपाणी परिसरातील शिवालयामध्ये ‘बम बम बोले’चा गजर
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील शिवालयामध्ये महाशिवरात्रीनिमित्त हर, हर महादेवाचा गजर झाला. शिवाय दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना केळी आणि शाबू खिचडीचे वाटप करण्यात आले. येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी भेट देऊन महादेवांचे दर्शन घेतले. यावेळी …
Read More »निवृत्त कर्नल ए. एम. ज्ञानकन यांचे निधन
बेळगावातील सैनिक, मार्गदर्शक व चर्च नेते हरपले बेळगाव : भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी कर्नल ए. एम. ज्ञानकन (वय ८७) यांचे १६ फेब्रुवारी २०२६ रोजी निधन झाले. ते एक कर्तृत्ववान सैनिक, आदरणीय समाजनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. १९३८ साली जन्मलेल्या कर्नल ज्ञानकन यांनी आयुष्यभर देशसेवा आणि समाजसेवेला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta