दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, भक्तगण तसेच मुंबई ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे सलामवाडीसह पंचक्रोशी परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. श्री हनुमान …
Read More »सतीश जारकीहोळी यांच्या निवासावरील ईडी छाप्याचे कारण वेगळे; मंजुनाथ प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बेंगळुरू आणि बेळगाव येथील निवासस्थानांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या छाप्याचा मंजुनाथ प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. ईडीकडून परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा)-१९९९ अंतर्गत सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानांसह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर शोधमोहीम राबविण्यात आली आहे. परदेशातील कथित बेकायदेशीर गुंतवणूक …
Read More »सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीय डॉ. गिरीश सोनवाळकर यांच्या घरावरही ईडीची छापेमारी
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानीही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. गिरीश सोनवाळकर यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगाव शहरातील लक्ष्मी टेक परिसरातील डॉ. गिरीश सोनवाळकर यांच्या निवासस्थानी ईडीचे …
Read More »मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नातेवाईकाच्या निवासस्थानीही ईडीची झडती
कर्नाटक-महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी एकाचवेळी कारवाई बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर बुधवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी शोधमोहीम हाती घेतली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी एकाचवेळी झडती सुरू असून, सतीश जारकीहोळी यांचे मेव्हणे तथा बेळगाव विभागातील अबकारी खात्याचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या …
Read More »मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
बेळगाव, बंगळूरसह १५ ठिकाणी कारवाई बेळगाव : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना बुधवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धक्का दिला असून, त्यांच्या निवासस्थानांसह कार्यालय आणि कर्नाटक, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांसह बेळगाव, बंगळूर आणि महाराष्ट्रातील एकूण १५ ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून …
Read More »माणिकवाडी क्रॉसजवळील दुचाकी-ट्रक अपघातात जखमी झालेल्या पत्नीचाही मृत्यू
खानापूर प्रतिनिधी : खानापूर–लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ मंगळवारी रात्री दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन भारतीय सैनिक युवराज शत्रुघ्न माळिक (३०) यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी मोहिनी युवराज माळिक (२५, रा. जटगे) यांचा उपचारासाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. …
Read More »माणिकवाडी क्रॉसजवळ दुचाकी-ट्रकची भीषण धडक; जटगे गावातील युवक ठार, पत्नी गंभीर जखमी
खानापूर प्रतिनिधी : खानापूर–लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ मंगळवारी (दि. ८) रात्री दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन युवराज शत्रुघ्न माळिक (वय ३०, रा. जटगे) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी मोहिनी युवराज माळिक (वय २५) गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युवराज व मोहिनी माळिक हे …
Read More »कुद्रेमानी–सोनोली रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन; 4 कोटींचा निधी मंजूर कुद्रेमानी (प्रतिनिधी) : बेळगाव ग्रामीणच्या आमदार तथा कर्नाटक राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मीताई आर. हेब्बाळकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या कुद्रेमानी–सोनोली रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी कुद्रेमानी येथे उत्साहात झाला. मंत्री हेब्बाळकर यांनी विधिवत पूजन करून …
Read More »बेळगावला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी
नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची सदिच्छा भेट बेळगाव : नुकतेच बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेले श्री. प्रकाश निकम यांची मंगळवारी ८ सप्टेंबर २०२६ रोजी विविध भागातील लोकप्रतिनिधी, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक-नगरसेविका, विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख तसेच मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नूतन पोलीस आयुक्तांना शुभेच्छा देत शाल, …
Read More »विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात; गोडसे शैक्षणिक निधीतर्फे ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री. खेमाजीराव तुकाराम गोडसे शैक्षणिक निधी (ट्रस्ट) यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक बक्षीस वितरण समारंभ सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्था, महिला विद्यालयाजवळ, बेळगाव येथे उत्साहात पार पडला. यावेळी ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास बी.के. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta