Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

सतीश जारकीहोळींसह निकटवर्तीयांच्या घरांवर दुसऱ्या दिवशीही ईडीची झडती

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली झडती गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. सतीश जारकीहोळी यांचे दाजी वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे व विविध माहितीची तपासणी करण्यात येत आहे. तसेच गोकाक येथील सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानीही …

Read More »

ईडी कारवाईविरोधात जारकीहोळी समर्थकांचे निदर्शने; राजकीय सूडबुद्धीचा आरोप

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणी झालेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी समर्थक अहमद रेशमी यांनी केंद्र सरकार आणि ईडीच्या कारवाईवर तीव्र टीका करत ही कारवाई राजकीय द्वेषातून व सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप केला. सतीश जारकीहोळी हे …

Read More »

तिलारीचे पाणी, म्हादाईचा मुद्दा अन् मराठी शाळांचे संरक्षण; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न, तिलारी व म्हादाई पाणीप्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्न, शिक्षक भरती तसेच मराठी शाळांच्या संरक्षणासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा मंदिर येथे समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी रणजीत चव्हाण यांनी …

Read More »

नवरत्न सन्मानाने श्री गणेश फेस्टिवलची यशस्वी सांगता

  बेळगाव : गेली 27 वर्ष सुरू असलेल्या आणि बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा समारोप झाला. आज बुधवारी सायंकाळी गुड शेड रोड येथील श्री माता सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नवरत्न सत्कार सोहळ्यात, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवरत्नांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 6 …

Read More »

सतीश जारकीहोळींचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांच्या घरावरही ईडीची छापेमारी

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणी ईडीकडून सुरू असलेल्या शोधमोहीमेअंतर्गत आता त्यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांच्या निवासस्थानावरही छापेमारी करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील कुमारस्वामी लेआऊट येथील मलगौडा पाटील यांच्या घरावर बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली. जारकिहोळी यांच्याशी …

Read More »

झोनल लेव्हल खो-खो स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शाळेचे घवघवीत यश

  बेळगाव : मच्छे येथील डिवाईन मर्सी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील झोनल लेव्हल क्रीडा स्पर्धेत येळळूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या मुलांच्या व मुलींच्या खो-खो संघांनी प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. मुलींच्या खो-खो संघात श्रावणी पाटील, रिया पाटील, आरोनी …

Read More »

लोकप्रिय नाभिक समाजातर्फे संत सेना महाराजांचे पुण्यतिथी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लोकप्रिय नाभिक समाजातर्फे संत सेना महाराजांची पुण्यतिथी करण्यात आली. त्यानिमित्त आडके प्लॉट येथील राहुल चव्हाण व कपिल चव्हाण यांच्या निवासस्थानापासून संत सेना महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी बेळगाव नाका, जुना पीबी रोड, नगरपालिका, मंगळवार पेठ मार्गे संत सेना भवन येथे नेण्यात …

Read More »

वीर सेवादल मध्यवर्ती समितीतर्फे नांदणीत १३ रोजी शांतीसागर महाराज पुण्यतिथी

  निपाणी (वार्ता) : प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांची ७१ वी पुण्यतिथी १३ सप्टेंबरला नांदणी मध्ये होणार आहे. नांदणी संस्थान मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल मध्यवर्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोज करण्यात आल्याची माहिती सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली. बोरगाव येथे …

Read More »

तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित अतिथी शिक्षकांना दिलासा; अनुदान मंजूर

  दोन-तीन दिवसांत मानधन खात्यात जमा होणार बेंगळूरू :राज्यातील सरकारी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो अतिथी शिक्षकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित असलेल्या अतिथी शिक्षकांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी सरकारने अनुदान मंजूर केले असून, येत्या दोन-तीन दिवसांत मानधन शिक्षकांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकारी शाळांमधील शैक्षणिक …

Read More »

गणेशोत्सव मंडळांची परवानगीसाठी उदासीनता; शेवटच्या टप्प्यात होणार धावपळ

  एक खिडकी सुविधेतून २७३ पैकी केवळ २० मंडळांनी घेतली परवानगी; २५३ मंडळे अद्याप प्रतीक्षेत बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. अनेक मंडळांकडून गणरायाच्या आगमन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असतानाच, उत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या घेण्याकडे मात्र मंडळांचे दुर्लक्ष …

Read More »