Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

तारांगण व आयएमए मार्फत कर्करोग जनजागृती कार्यक्रम उद्या

बेळगाव : उद्या दिनांक 4 फेब्रुवारी २०२२ रोजी जागतिक कर्करोग दिन यानिमित्त तारांगण व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांसाठी प्रख्यात स्त्री रोग तज्ञ व जिव्हाळा फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दू यांचे व्याख्यान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगाचा वाढणारा …

Read More »

“मराठी शाळेचा सर्वांगीण विकास, हा एकच ध्यास”

1991-92 च्या माजी विद्यार्थ्यांचा एक स्तुत्य उपक्रम बेळगाव : उचगाव येथील प्राथमिक मराठी शाळेच्या, 1991-92 च्या, 7 वी च्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या योगदानातून, या वर्षात एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. शाळेचा सर्वांगीण विकास या एकाच ध्यासापोटी, एक सुरुवात म्हणून शाळेच्या दोन वर्गांना पुरतील अशी 35 बैठक आसने (डेस्क) विद्यार्थ्यासाठी आणि …

Read More »

खानापूर जंगलात उद्यापासून सुरू ‘व्याघ्रगणना’

खानापूर : बेळगाव विभागीय वनक्षेत्राच्या खानापूर तालुक्यातील जंगलात वाघांचे वास्तव्य असून भीमगड अभयारण्य, नागरगाळी, कणकुंबी जांबोटी आदी ठिकाणच्या जंगलात लाईन ट्रांझॅक्ट मेथड (रेषा विभाजन) आणि कॅमेरा ट्रॅप पद्धतीने वाघांची गणती करण्यात येणार आहे. सदर 4 वर्षातून एकदा होणारी व्याघ्रगणना उद्या शुक्रवार दि. 4 पासून सुरू होत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन …

Read More »

गोवावेस येथील व्यापारी संकुल लवकरच जमीनदोस्त होणार

बेळगाव : गोवावेस येथील व्यापारी संकुल पाडण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला आहे. ते संकुल जुने आहे व ते धोकादायक स्थितीत असल्याचे कारण देण्यात आले आहे. यासाठी तेथील गाळेधारकांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. दुकानगाळे रिकामे करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गाळे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या या …

Read More »

सरकारी एपीएमसी सचिवांना एपीएमसी व्यापाऱ्यांनी घेरले

बेळगाव : सरकारी एपीएमसीचे सचिव डॉ. कोडीगौड यांना एपीएमसी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी घेराव घातला. खाजगी एपीएमसी निर्माण करण्यात आल्यासंदर्भात एपीएमसीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव शहरात सरकारी एपीएमसी योग्यरितीने सुरु असूनही शड्डू मारून काही लोकांनी खाजगी एपीएमसी निर्माण केली आहे. याविरोधात शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि …

Read More »

बेकवाड- बिडी मार्गावर बर्निंग ट्रक

शाॅर्टसर्किटमुळे ट्रकचे प्रचंड नुकसान खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर यल्लापूर महामार्गावरील बेकवाड बिडी दरम्यान धावणाऱ्या ट्रकला गुरूवारी दि. ३ रोजी दुपारी अचानक आग लागल्याने ट्रक जळुन खाक झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर यल्लापूर राज्यमार्गावर बेकवाड बिडी दरम्यान केए २२ बी ४०५८ क्रमांकाचा ट्रक खानापूरहुन बिडीकडे येत होता. यावेळी …

Read More »

चापगांव हायस्कूलमध्ये सर्पमित्र उमेश अंधारे यांचे सर्पाविषयी मार्गदर्शन

खानापूर (प्रतिनिधी) : चापगांव (ता. खानापूर) येथील मलप्रभा हायस्कूलच्या पटांगणावर सर्पमित्र उमेश अंधारे यांनी लहानपणापासून मुलाच्या मनातील सापाविषयीची भिती दुर व्हावी. तसेच विविध सापाच्या जाती व साप हा शेतकऱ्याचा मित्र कसा आहे याबद्दलही माहिती दिली. यावेळी त्यांनी यडोगा येथे पकडलेल्या विषारी नाग सर्पाविषयी माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विषारी आणि बिनविषारी …

Read More »

माणिकवाडीत शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : माणिकवाडीत (ता. खानापूर) येथे पोवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधुन शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाला भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, शिवशक्ति सोसायटीचे संस्थापक शंकर पाटील, ग्राम पंचायत सदस्य व प्रा. शंकर गावडा, सदस्या सौ. प्रीती गोरल, माजी सैनिक महादेव …

Read More »

‘पांघरूण’च्या निमित्ताने रंगणार सांगितिक मैफल

कोल्हापूर : काकस्पर्श, नटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेला ‘पांघरूण’ हा चित्रपट उद्या (ता. ४) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ‘पांघरूण’ या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून या चित्रपटात एक विलक्षण प्रेमकहाणी आहे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सांगितिक मेजवानी आहे. ६० च्या दशकातील …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारावर जाहीरपणे बोलण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

मंत्रिपदासाठी दबाव वाढला, मुख्यमंत्री सोमवारी दिल्ली दौऱ्यावर बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत जाहीरपणे भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. विधानसभेचा कार्यकाळ केवळ एक वर्ष शिल्लक असल्याने विनाविलंब मंत्रिमंडळ विस्तार व पुनर्रचना करण्याच्या मागणीने जोर घेतला आहे. बोम्मई यांनी पत्रकारांना …

Read More »