Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवांची ज्योतिबा मंदिरला भेट

बेळगाव : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडी यांनी बेळगावच्या श्री ज्योतिबा देवस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांचा बेळगावातील चव्हाट गल्ली ज्योतिबा मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला. बेळगावातील ज्योतिबा मंदिराचे सागवान नवरंग लाकडी गाभाऱ्याचे कामाचे कौतुक करत बेळगावची ज्योतिबा सासनकाठी यंदाच्या वर्षी ज्योतिबा यात्रेत दिलेली भेट शिस्तबद्ध आयोजनाची आठवण करून …

Read More »

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? पवारांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय

मुंबई : सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. इकडे राज्यात सत्ता बदलाची शक्यता व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राजीनामा देतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. …

Read More »

शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यासर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा …

Read More »

भाजपकडून आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

नवी दिल्ली : एनडीएकडून राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी आपला संयुक्त …

Read More »

योग हा जीवनाचा मार्ग : पंतप्रधान मोदी

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन बंगळूर : योग हा जीवनाचा भाग नसून, ती एक जीवन पद्धती आहे, तो एक जीवनाचा मार्ग आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हैसूर येथे व्यक्त केले. ऐतिहासिक भव्य म्हैसूर महाराजा राजवाड्याच्या आवारात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे …

Read More »

योगाने मनशुध्दी साध्य : महादेवी पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : योग-प्राणायमने मनशुध्दी करणे साध्य असल्याचे स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या कार्यदर्शी श्रीमती महादेवी पाटील यांनी सांगितले. संकेश्वर विश्व चेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद शाळेच्या आवारात शालेय मुला-मुलींनी, शिक्षक-शिक्षिकांनी योग-प्राणायमाचा सराव …

Read More »

नंदगड येथील डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात सम्रता लोहार प्रथम

खानापूर : नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचालित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेची सम्रता लोहार हिने 550 (91.66%) प्रथम क्रमांक संपादित केला आहे. वैभवी केसरकर 546 (91%) गुण मिळवत द्वितीय क्रमांक संपादित केला आहे. स्वाती मदावळकर हिने 537 (89.50%) गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला …

Read More »

मला मंत्री केलं नाही तरी चालेल पण भाजपसोबत सत्ता स्थापन करा… एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यामध्ये शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती आहे. मला मंत्रीपद नाही दिलं तरी चालेल पण भाजपसोबत युती करावी असं त्यांनी म्हटलं आहे. यावर मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर …

Read More »

जिल्हा संपर्क केंद्रातून शेतकऱ्यांना न्याय देणार

राजू पोवार : बेळगावमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : कृषिप्रधान देशात शेतकरी हा मुख्य कणा आहे. तरीही त्याच्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकारे अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकजूट करून शासनाच्या विरोधात लढल्याने हा अन्याय दूर झाला आहे. अजूनही वेगवेगळ्या प्रकारे त्याचा छळ सुरू आहे. त्याच्याविरोधात रयत संघटना …

Read More »