Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर म. ए. समितीची बैठक उद्या

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक गुरूवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे आयोजित केली आहे. तरी कार्यकारिणीच्या सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सरचिटणीस आबासाहेब दळवी येत कळविले …

Read More »

जलतरण स्पर्धेत बेळगावच्या ज्योती कोरी यांचे घवघवीत यश

बेळगाव : कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या निमंत्रितांच्या श्रीलंका मास्टर्स शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या नामवंत महिला जलतरणपटू आणि कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी ज्योती कोरी यांनी 4 सुवर्ण व 2 कांस्य पदक हस्तगत करून घवघवीत यश संपादन केले. कोलंबो, श्रीलंका येथील थ्रस्टन कॉलेज जलतरण तलावामध्ये गेल्या 5 मार्च रोजी …

Read More »

‘नियती’तर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण

बेळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण -मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने शहरातील नियती फाऊंडेशनतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले पुरस्कार -2022 वितरण, महिला दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा संयुक्त सोहळा आज मंगळवारी उत्साहात पार पडला. शहरातील आयएमईआर सभागृहांमध्ये नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

सौंदलगा येथील मराठी मुलांच्या शाळेत महिला दिन मोठ्या उत्साहात

सौेदलगा : सौंदलगा येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेमध्ये जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरवातीला मान्यवरांचे शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. येथील सरकारी कन्नड शाळेच्या मुलींनी महिलादिना निमित्त राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई, शूरवीरवब्बवा, राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नमा या थोर, शुरवीर, महिलांच्या हुभेहुभ वेषभूषा सादर केलेेल्या …

Read More »

सुवर्णलक्ष्मी सोसायटीत महिला दिन

बेळगाव : सुवर्णलक्ष्मी सोसायटीतर्फे महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. महानगरपालिकेत काम करणार्‍या राजश्री जाधव, उज्ज्वला हंगिरगेकर, तारा सालीकर या महिलांचा सत्कार करण्यात आला तर साक्षी मुतकेकर, गुणंजय शिरोडकर, प्राजक्ता देशपांडे, आदित्य बाळेकुंद्री, अनुज किल्लेकर, सुकृती कारेकर, प्रीती धुडूम, सई कारेकर, कीर्ती बांदिवडेकर आदींचा गौरव करण्यात आला. प्रमुख …

Read More »

टीजेएसबी बँकेत महिला दिन साजरा

बेळगाव : चन्नम्मा चौकातील टीजेएसबी बँकेच्या शाखेत दि. 8 रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शहर परिसरातील विविध क्षेत्रातील प्रथितयश महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता भांदुर्गे, उद्योजिका मेधा बी. देशपांडे, प्रिया कवठेकर, व्यावसायिका अनघा कांबळे, एमव्हीएम इंग्लीश स्कूलच्या प्राचार्या कविता परमाणिक, तसेच स्मिता हवालदार, व्यावसायिक ज्योती …

Read More »

जांबोटी क्राॅसवरील रस्त्याच्या डांबरीकरणाला तब्बल दोन वर्षानंतर सुरूवात

खानापूर (प्रतिनिधी) : जत- जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील अर्धवट असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला तब्बल दोन वर्षानंतर सुरूवात करण्यात आली. जत- जांबोटी महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तसेच डांबरीकरणासाठी २० कोटीचे अनुदान मंजुर करण्यात आले. यामध्ये पारिश्वाड ते खानापूर शिवाजीनगर पर्यंतच्या जांबोटी रस्त्याच्या काम गेल्या दोन वर्षापासून हातात घेतले आहे. याकामा निमित्ताने …

Read More »

‘अंकुरम’मध्ये नाटीकेच्या माध्यमातून महिला दिन

निपाणी (वार्ता) : येथील श्रीनगर मधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक व कर्मचारी सर्व स्टाफ हा महिलांचा आहे. शाळेमध्ये नर्सरी ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शाळेच्या स्थापनेचा मुळात उद्देशच असा होता की ग्रामीण भागातील व शहरी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याच उद्देशाने या …

Read More »

बेळगावच्या महिलेचा ‘नारी शक्ती’ने सन्मान

बेळगाव : देवदासी पद्धतीच्या निर्मूलनासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील शोभा गस्ती यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन नारी शक्ती हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी नारी शक्ती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘मला या सन्मानाची अपेक्षा नव्हती. या पुरस्कारामुळे माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या …

Read More »

जायंट्स मेनच्या वतीने पाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

बेळगाव : आपण आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस जरी साजरा करत असलो आणि महिलांच्या सन्मानाविषयी बोलत असलो तरी महिलांचा सन्मान कशा पद्धतीने करावा हे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी खूप चांगल्या पध्दतीने हे शिकवले असे प्रा. मनिषा नेसरकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. इथे सत्कारमूर्ती सोडले की सगळी पुरुष मंडळी उपस्थित आहेत …

Read More »