Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

विविध मागण्यांसाठी कम्युनिस्टांची निदर्शने

बेळगाव : वाढती महागाई, भाषिक अल्पसंख्यांक नागरिकांचे हक्क आणि योग्यरितीने कोविड व्हॅक्सिनेशन व्हावे या मागण्यांसाठी बेळगाव शहरात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले असून लवकरात लवकर सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनामध्ये वाढत्या इंधन दरासंदर्भातील मुद्द्यावर …

Read More »

पत्र मोहिमेत महिलांची आघाडी

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्नी आपण वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा आणि आम्हा 20 लाख मराठी बांधवांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा, अशा मागणीची एक हजाराहून अधिक पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांवे पाठविण्याची मोहीम आज सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीतर्फे राबविण्यात आली. सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांसह शहरातील …

Read More »

पंतप्रधानांना पत्र पाठवायच्या कार्यक्रमाचे येळ्ळूरमध्ये थाटात शुभारंभ

येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर यांच्यावतीने भारताचे पंतप्रधान यांना सीमावासीयाच्यावतीने सीमाप्रश्न सोडवणूक करावी असा मजकूर लिहून पत्र पाठविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यांना पाठिंबा देत येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आव्हान केल्यानंतर येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज प्रत्येक गल्लीतील नागरिकांनी पत्रे लिहून आजपर्यत 2150 पत्रे समितीकडे सोपविली …

Read More »

खानापूरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविडचे नियम बंधनकारक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात साजरा होणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविड-19 चे नियम सक्तीचे व बंधनकारक असतील कारण देशात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमावर सरकारने कोविडच्या नियमाचे पालन बंंधनकारक केले आहे. त्यामुळे येणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोविड-19 नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडप नको, मंदिर किंवा …

Read More »

रखडलेली घरे द्या, मगच सर्वे करा

राजेंद्र वड्डर : अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन निपाणी : दोन वर्षांपूर्वी सन 2019 साली अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्यावेळी निपाणी तालुक्यातील पडलेल्या घरांचा सर्वे करून त्यांना नवीन घरे बांधून देण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. पण दोन वर्षाच्या काळात 594 घरे पूरग्रस्तांना बांधून देता आलेली नाही मात्र आता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी काळात पडलेल्या …

Read More »

सोशल डिस्टन्स ठेवत हर, हर महादेवचा गजर!

मंदिरात सॅनिटायझर फवारणी : कोरोना मुक्तीसाठी साकडे निपाणी : गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच सण उत्सवावर निराशेचे सावट पसरले आहेत. अशा परिस्थितीत निपाणी शहर आणि ग्रामीण भागात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी (ता. 9) सोशल डिस्टन्स ठेवत शिवमंदिरात हर, हर महादेवाचा गजर झाला. मात्र कोरोनामुळे इतर धार्मिक कार्यक्रम, तीर्थप्रसाद, …

Read More »

हस्तांतर ठराव मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन

म्युन्सिपल हायस्कूल बचाव कृती समिती : तहसीलदारांना निवेदन निपाणी (संजय सुर्यवंशी) : सत्तेच्या जोरावर निपाणी नगरपालिकेने सुस्थितीत असलेली म्युन्सिपल हायस्कूलची इमारत सरकारला हस्तांतर करून पाडण्याचा घाट घातला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले दोन्ही ठराव बुधवार (ता. 25) ऑगस्टपर्यंत मागे न घेतल्यास गुरुवार (ता. 26) पासून निपाणी नगरपालिका समोर तीव्र …

Read More »

सीमाप्रश्नी पंतप्रधानांना गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे पाठविण्याचा संकल्प

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला.खानापूर तालुक्यातील समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गाव गर्लगुंजी या गावातून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा जाहिर करून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा …

Read More »

२३ तक्रारींना खानापूर मेघा लोकअदालतीत मिळाला न्याय

खानापूर प्रतिनिधी) : खानापूर येथील न्यायालयात शनिवारी मेघा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी या मेघा लोकअदालतीतून २३ तक्रारी निकालात निघाल्या.मेघा लोकअदालतीला बेळगाव जिल्हा न्यायाधिश श्री. हेमंतकुमार, न्यायाधिश शिरोळी, खानापूर न्यायाधिश पी. मुरलीमनोहर रेड्डी, एस. सुर्यनारायण तसेच खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी होते.शनिवारी झालेल्या स्पेशल मेघा लोकअदालतमध्ये सहकारी क्षेत्रातील …

Read More »

तारांगण-वैशाली स्टोन क्रशर मार्फत घेण्यात आलेल्या नादब्रह्म ऑनलाईन भजन स्पर्धेत साईराम प्रथम, स्वरगंध व मुक्ताई द्वितीय

बेळगाव (वार्ता) : आषाढी एकादशी निमित्य तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांनी आयोजित केलेल्या नाद ब्रम्ह ऑनलाईन भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज सोमवार दिनांक 9ऑगष्ट रोजी दुपारी 3 वा. महिला विद्यालय मराठी शाळेच्या सभागृहात होणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक सौ. रुक्मिणी निलजकर वैशाली स्टोन क्रशर या आहेत. या स्पर्धेला …

Read More »