Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात जिल्हास्तरीय खुली रोड रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने बेळगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या रोलर स्केटिंग रोड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील मराठा कॉलनीत रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय फ्री रोलर स्केटिंग रोड चॅम्पियनशिपमध्ये 160 हून अधिक स्केटर्सनी भाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक नंदकुमार मिरजकर यांनी केले. याप्रसंगी जायंट्सचे माजी फेडरेशन …

Read More »

स्वा. सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच पाक आणि बांगलादेश यांसारखे देश कुरापती काढत आहेत! : श्री. नरेंद्र सुर्वे

कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे क्रांतीकारक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चीन, पाकिस्तान यांसारख्या आजूबाजूच्या देशांची स्थिती पाहता भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने विदेश नीती काय असावी, याविषयी त्यांनी सजगपणे विचार मांडले होते. देशाच्या सीमा सुरक्षित रहाण्यासाठी भारतीय युवांचे सैनिकीकरण व्हायला हवे, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका होती. त्यांनी गावोगावी जाऊन यासंबंधी मोठ्या …

Read More »

…आता हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा

गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा साधु महंतांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव हे किष्किंधा नगरी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. एवढेच नाही तर शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची किष्किंधा नगरी अशीच नोंद असल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे. ज्ञानवापी नंतर …

Read More »

भाजपने स्वतःच्या स्वार्थासाठी संभाजीराजेंचा दुरुपयोग केला

संजय राऊतांचा घणाघाती आरोप नवी दिल्ली : सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकांवरुन राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सातत्यानं जडत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि त्यातील दोन उमेदवार शिवसेनेचेचं असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच, भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे …

Read More »

सांबरा प्राथमिक मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

बेळगाव : शिक्षकांनी केलेले संस्कार, चुकीच्या वेळी केलेली शिक्षा, वर्गातील गमतीजमती, परीक्षेचा तणाव, निकालाची उत्सुकता अशा अनेक आनंदी तर काही भावनिक आठवणींना उजाळा देत सांबरा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या 1994- 2001 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात उत्साहात पार पडला. तब्बल 21 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात …

Read More »

व्हिडीओ चुकीचा असल्याची देवाप्पा गुरव यांची स्पष्टोक्ती

खानापूर : रविवार दि. 29 रोजी दुपारी खानापूर तालुका समितीला कांहीं कार्यकर्त्यांनी मला जबरदस्तीने नेऊन खोटेनाटे सांगून खानापूर समितीच्या एकीच्या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने माझ्याकडून त्यांनी लिहिलेले वाचून घेतले. त्या दरम्यान त्यांनी जाणीवपूर्वक माझा व्हिडीओ काढला आणि तो समाज माध्यमांवर प्रसारित केला. त्यामुळे तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला. त्याकरिता …

Read More »

मातृभाषेतुन शिक्षण घेणे, हाच भविष्यातील पाया आहे : प्रा. मनीषा नाडगौडा

बेळगाव : आत्मविश्वासातून आयुष्यात चांगले वळण लागते. अभ्यासाबरोबरच छंद जोपासावा, खेळात प्राविण्य मिळवावे जिद्द कसोटीतून आपण आपले ध्येय गाठू शकतो आदर, प्रामाणिकपणा हेच गुण जीवनात यशस्वी करू शकतात. मातृभाषेतून शिक्षण घेणे हाच भविष्यातील पाया आहे, असे प्रतिपादन प्रा. मनीषा नाडगौडा, बी.डी. जती कॉलेज यांनी अध्यक्षपदावरून विद्यार्थी गौरव सोहळ्यात विचार व्यक्त …

Read More »

गुजरात रायटन्स चॅम्पियन!

अहमदाबाद : कर्णधार हार्दिक पंड्याच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर आपला पहिलाच हंगाम खेळणार्‍या गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला 7 गड्यांनी हरवले. कर्णधार हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजीत 3 गडी बाद तर फलंदाजीत 34 धावा जोडल्या. त्याला सामनावीरचा …

Read More »

मुख्याध्यापक वाय. एच. पाटील व एस. एन. जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

बेळगाव : पश्चिम विभाग शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश हायस्कूल बिजगर्णीचे (ता. बेळगाव) मुख्याध्यापक वाय. एच. पाटील व लिपिक एस. एन. जाधव यांचा शुक्रवारी (ता.२७) निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. हायस्कूलच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप देण्यात आला. व्यासपीठावर …

Read More »

कावळेवाडीचा उदयोन्मुख कुस्तीपटू पै. रवळनाथला दहा हजाराचे सहकार्य

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयच्या वतीने गावातील शाळेत पै.रवळनाथ श्रीधर कणबरकर याचा सन्मान करण्यात आला. रवळनाथ हा नुकताच हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन आला आहे. बाबा भोलादास आखाड्यात दीड महिना सराव केला. सोनिपत खरकोदा येथील राष्ट्रीय पातळीवर कुस्ती कोच अशवनी दया यांच्याकडे त्याने प्रशिक्षण …

Read More »