संकेश्वर (प्रतिनिधी) : उद्या गुरुवार दि. १७ रोजी हुताशनी पौर्णिमा होळी असल्यामुळे आज संकेश्वरात मुले-मुली युवक सार्वजनिक होळीसाठी टिमक्यांच्या निनादात घरोघरी जाऊन शिमगा करीत शेणकूट लाकडे, सरपण आणि देणगी गोळा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. शेतकरी कुटुंबातील घरांत शेणकूट, सरपण तर मोजक्याच घरांत लाकडे सार्वजनिक होळीसाठी मिळताना दिसली. प्रत्येकाच्या घरात आज …
Read More »पोलीओ प्रमाणेच कोविडवरही भारत लवकरच मात करु शकेल :- एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली : आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. लशींचं महत्त्व आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मार्च हा दिवस लसीकरण दिवस म्हणून पाळला जातो. याचं औचित्य साधून आजपासूनच १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु केल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे. १८० कोटीपेक्षा …
Read More »योग करा निरोगी राहा : अमर नलवडे
संकेश्वर (प्रतिनिधी) : योग-प्राणायम करा, निरोगी राहा, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी सांगितले. ते संकेश्वर साई भवन येथे ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे उदघाटन करुन बोलत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांनी भूषविले होते. …
Read More »युवा समितीच्या वतीने वडगांव येथील शाळा क्र. ३१ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : दि. १६/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत वडगांव येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ३१ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर …
Read More »पॅरा स्वीमर साहिल काजूकर याचा किरण जाधव यांच्याकडून गौरव
बेळगाव : राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेल्या जलतरणपटू साहिल काजूकर याचा विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण जाधव यांनी सन्मान केला. साहिल काजूकर याने नुकत्याच झालेल्या कर्नाटक स्टेट लेवल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप या जलतरण स्पर्धेत 1 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावून बेळगावचा लौकिक वाढविला आहे. पॅरा जलतरणपटू साहिल …
Read More »देवलत्ती श्री लक्ष्मी यात्रेसाठी परवानगी द्या…
देवलत्ती (ता. खानापूर) गावच्या श्री लक्ष्मीदेवी यात्रेत्सवाला परवानगी देण्याबरोबरच यात्रेच्या ठिकाणी वीज, पाणी आदी आवश्यक मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देवलत्ती ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. देवलत्ती (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांनी आज बुधवारी सकाळी बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त …
Read More »मे मध्ये द.भा. जैन सभेचे शंभरावे अधिवेशन
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर : बोरगावमध्ये संवाद बैठक निपाणी (वार्ता) : कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे १५ मे च्या दरम्यान द. भा. जैन सभेचे शंभरावे अधिवेशन भव्य स्वरुपात सांगलीत होणार आहे. त्यासाठी लाखाच्या संख्येत जैन समुदाय उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री आदित्य …
Read More »स्पाईस जेटच्या वेळापत्रकात होणार बदल
बेळगाव : दिल्ली -बेळगाव -दिल्ली ही विमान सेवा येत्या 27 मार्चपासून दररोज सुरू राहणार असल्यामुळे स्पाईस जेट कंपनीने आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार स्पाईस जेटच्या दिल्ली, हैदराबाद व मुंबई फेऱ्या सुरू होणार आहेत. सध्या बेळगावमधून दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे, इंदूर, जोधपूर, तिरुपती व अहमदाबाद या शहरांना विमानसेवा …
Read More »संभाजी महाराजांचा खरा इतिहास उजेडात यावा : प्रा. गुलाब वाघमोडे यांचे प्रतिपादन
सासवडला शंभूराजे साहित्य संमेलन उत्साहात सासवड : छत्रपती संभाजी महाराज यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले असून, इतिहासकारांनी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. शंभूराजांचां खरा इतिहास जनतेसमोर यावा. यासाठी छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनामुळे दडविलेला इतिहास उजेडात येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्रा. गुलाब वाघमोडे यांनी केले. सासवड येथे साहित्य संमेलन …
Read More »संकेश्वरची अन्यायकारक पाणीपट्टी बंद करा : मुस्तफा मकानदार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला लोकांची चिंता आहे की नाही. गेल्या दोन वर्षांपासून संकेश्वरातील लोक कोरोना महामारीने कंगल झाले आहेत. बऱ्याच युवकांना नोकरी गमवावी लागली आहे. व्यापार-व्यवसाय घाट्यात चालवला आहे. त्यामुळे गोरगरिब, कष्टकरी सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा स्थित पालिकेची आव्वाची-सव्वा पाणीपट्टी लोक भरणार कोठून हा प्रश्न निर्माण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta