बेळगाव : बेळगांव ग्रामीण भाजपच्यावतीने देसूर येथील मराठी शाळेला सात ग्रीन बोर्डाची देणगी देण्यात आली. मंगळवार दि. 25 ऑक्टोबर रोजी मराठी शाळा येथे सदर कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष रणजित पोटे यांनी भुषविले होते. प्रारंभी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यानी ईशस्तवन व प्रास्ताविक आनंद पाटील यांनी केले तर स्वागत मुख्याधापक …
Read More »जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची भेट
खानापूर : जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने केम्पेगौडा नगर बेंगळुरू येथील गवीपुरम गंगादेश्वर शिवमंदिरचे स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची नुकतीच भेट घेतली आणि मराठा समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अभिलाष देसाई यांनी मंजुनाथ स्वामीजींना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची …
Read More »बेळगावच्या तीन समाजसेवकांचा कुर्ली येथे सत्कार!
बेळगाव : कोरोना काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा हनुमान तालीम आणि शिंत्रे आखाडा कुर्ली यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. बेळगावातील फेसबूक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर आणि हेल्प फोर निडीचे सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला. संतोष दरेकर हे नेहमी गरजूंना वेळेवर रक्त मिळावे आणि …
Read More »शेतीमालाच्या हमीभावासाठी लढा उभारणार : राजू पोवार
शिवापूरवाडीत रयत संघटनेचे उद्घाटन निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्यांच्या विरोधातील कृषी कायदा आणून त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी एकत्र येऊन लढा देत आहेत. शेतकर्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तो हाणून पाडण्यासाठी शेतकर्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.शेतकरी, शेतमजूर व कामगार …
Read More »बँकेच्या माध्यमातून सक्षम उद्योजक बना
पुष्पा किशोर : एसीएसटी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन निपाणी : भारत सरकारने एससी एसटी मागासवर्गीय यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी व इंडस्ट्रियल निर्माण करून स्वत:च मालक होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तुम्ही देखील प्रयत्न करून बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन सक्षम उद्योजक बना व उद्योग द्या असे प्रतिपादन …
Read More »नियमांचे पालन केल्यास अपघात टाळणे शक्य
मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी : ऊस वाहतूक करणार्या वाहनधारकांना मार्गदर्शन निपाणी : वाढत्या अपघाती घटना रोखण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, विशेष करून ऊस गळीत हंगाम काळात ऊस वाहतूक करणार्या वाहनांच्या अपघाती घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांच्या पालनाबरोबरच आपल्या वाहनाच्या मागील व …
Read More »‘अरिहंत’ने शेतकर्यांचे जीवनमान उंचावले : संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील
अरिहंत दूध संघाकडून 5.2 लाख बोनस वाटप निपाणी : ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या दुग्ध व्यवसायाला उर्जितावस्था देण्या बरोबरच दूध उत्पादकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची स्थापना करण्यात आली. या दूध संघामार्फत गेल्या 15 वर्षापासून दूध उत्पादकांना खास दिवाळी निमित्त बोनस …
Read More »खेलरत्न पुरस्काराची घोषणा; नीरज चोप्रा, रवि दहियासह 11 खेळाडूंना मिळणार पुरस्कार
नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक 2021 स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्या अॅथलीट नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणार्या खेळाडूंची नावही या यादीत आहेत. तसेच महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचही नावं …
Read More »…म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; करवेची कोल्हेकुई
बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिन धुमधडाक्यात साजरा करण्याऐवजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन आचरणात आणण्यात येतो, यामुळे या समितीवर संपूर्णपणे बंदी घालण्याची मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रत्येक वर्षी 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काळा दिन पाळण्यात येतो. याविरोधात करवे संघटनेने कन्नड भाषिकांचा अपमान होत असल्याचे म्हटले …
Read More »माध्यान्ह आहारात लवकरच दुधाचे वाटप
बेंगळुरू : शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीचे पर्यंतचे वर्ग पूर्वपदावर आल्यामुळे तयार माध्यान्ह आहार वितरणास सुरुवात झाली असून लवकरच विद्यार्थ्यांना क्षीरभाग्य योजनेअंतर्गत दुधाचे वाटप केले जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 23 ऑगस्टपासून नववी ते दहावी तर 6 सप्टेंबरपासून इयत्ता सहावी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta