Thursday , July 30 2026
Breaking News

Belgaum Varta

कोविडचे संकट दूर करून राज्याला सुबत्ता देण्याची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आई महालक्ष्मीला प्रार्थना!

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा कोल्हापूर (जिमाका) : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सुरक्षेची पाहणी केली. पोलीस विभागाने यापुढील काळात ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान …

Read More »

शोषितांच्या जगण्याला बळ देऊया

प्रा. सुरेश कांबळे : डॉ. आंबेडकर विचार मंचची चिंतन बैठक निपाणी : अलीकडच्या काळात समाजामध्ये राजकीय नीतिमूल्ये यांच्यामध्ये अतिशय नकारात्मक भावना निर्माण होऊन समाजाला दिशाहीन बनवणार्‍या व्यवस्थेत खर्‍या अर्थाने शोषितांची अवस्था वाईट होत आहे. हा समाज जगण्यासाठी धडपडत आहे. परंतु प्रस्थापित समाज वस्तीमध्ये अशा गरीब समाजाला दुर्लक्षित ठेवून राजकीय लाभ …

Read More »

चोरटा गजाआड : 11 मोटरसायकली जप्त

बेळगाव : माळमारुती पोलिसांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये हुन अधिक किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी आणि माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहर आणि …

Read More »

कुंचीमुळे श्वास गुदमरून अर्भकाचा मृत्यू

बेळगाव : डोक्याला घालण्याची कुंचीची दोरी गळ्याभोवती आवळली गेल्यामुळे अवघ्या सहा दिवसांच्या स्त्री जातीच्या एका अर्भकाचा श्वास गुदमरून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय 21) या महिलेला बाळंतपणासाठी नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल …

Read More »

महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्या

कागल तालुका शिवसेनेची मागणी : मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी यांना निवेदन निपाणी (वार्ता): महाराष्ट्रातील एस.टी.ना कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशा मागणीचे निवेदन कागल तालुका शिवसेनेच्या वतीने निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक निपाणी सीमाभागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली, लिंगनूर, मुरगुड, …

Read More »

बेळगावात पुन्हा कानडी दादागिरी, मराठी बांधवांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली!

राज्योत्सव मात्र कोविड नियमावलीनुसार साजरा करणार बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमालढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभाग महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटकात घेतला गेल्याच्या निषेधार्थ काळा दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या सहा दशकात यात कधीही खंड पडला नाही आणि सदनशीर मार्गाने मूकफेरी काढून सीमावासीय मराठी जनता आपला निषेध व्यक्त …

Read More »

किरकोळ महागाईत घट; केंद्राला मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ (सीपीआय इन्फ्लेशन) 4.35 टक्क्यांवर आल्यामुळे देशाला मोठाच दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे ही चलनवाढही आटोक्यात राहिली आहे. मागील महिन्यात ही चलनवाढ 5.30 टक्के एवढी होती. या चलनवाढीचा दर घटल्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही …

Read More »

मंत्रिपदासाठी आ. रमेश जारकीहोळींची थेट दिल्लीतून फिल्डिंग

बेळगाव : मध्यंतरी काही काळ शांत बसलेल्या गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची कुणकुण लागल्याने त्यांनी आता दिल्ली गाठली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खबर लागल्याने आ. रमेश जारकीहोळी यांनी दिल्ली गाठली आहे. याआधी हात दिलेले मंत्रिपद येनकेन प्रकारे …

Read More »

आमदारांनी दांडी मारल्यामुळे बुडाची सभा लांबणीवर

बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासंदर्भात महत्वाची चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘बुडा‘च्या बैठकीला भाजप आमदारांच्या अनुपस्थितीचे ग्रहण लागले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर टाकण्यात आली. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाची चौथी बैठक सोमवारी बोलावण्यात आली होती. गेल्या सलग दोन बैठकांना गैरहजर असलेले भाजप आ. अभय पाटील आणि अनिल बेनके या बैठकीलाही अनुपस्थित होते. मात्र …

Read More »

निपाणीत पावसाचा हाहाकार!

घराघरात पाणी : घरांच्या भिंतीनाही पाणी निपाणी : आठवडाभर उन्हाचा तडाखा बसून सोमवारी (ता. 11) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शहर आणि परिसरात हाहाकार माजला. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील शिवाजीनगर सहाव्या गल्लीतील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. हे पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ …

Read More »