Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आजपासून

  दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन; महनीय व्यक्तींची उपस्थिती बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम उद्या शनिवार दि. 26 आणि रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी सध्या जय्यत तयारी करण्यात …

Read More »

रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न

  बेळगाव : बेळगावच्या वीरभद्र नगरमध्ये भरदिवसा एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरात पाच दरोडेखोर घुसून बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली. रिअल इस्टेट व्यावसायिक मैनुद्दीन पठाण यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश केला, व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डोक्यावर बंदूक रोखली, घर लुटण्याचा प्रयत्न केला आणि रिकाम्या हाताने पलायन केले. …

Read More »

येळ्ळूर मराठी मॉडेल शाळा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची जय्यत तयारी; मा. शरद पवार यांची उपस्थिती

  बेळगाव : येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील स्वातंत्र्यपूर्व काळात 1874 मध्ये स्थापन झालेल्या सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव शाळेच्या माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने उद्या शनिवार दि. 26 आणि रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी सध्या जय्यत तयारी करण्यात …

Read More »

आनंदनगर वडगाव येथे पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात

  वडगाव : आनंदनगर वडगाव येथे पेव्हर्स बसविण्याच्या कामाला बुधवार (ता. 23) रोजी सकाळी 11 वाजता या भागाच्या नगरसेविका सारिका पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. आनंद नगर दुसरा क्रॉस पासून ते तिसऱ्या क्रॉस पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीने खोदाई करून, त्यावर खडीकरण करण्यात आले. खडीकरण झालेल्या रस्त्यावर पेव्हर्स बसवण्याचे काम …

Read More »

बालशिक्षण व विद्या विकास शिबीराला प्रारंभ

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेच्या मान्यतेने, विद्याभारती कर्नाटक व बेळगाव जिल्हा विद्याभारती आयोजित बालशिक्षण व विद्या विकास शिबिराला प्रारंभ झाला. शिबिराच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंदराव देशपांडे, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, बेळगांव शहर गटशिक्षण कार्यालयाचे …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूल येथे शिक्षकांसाठी “सर्वांगीण विकासासाठी शिक्षण” या विषयावर कार्यशाळा संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल येथे 24 एप्रिल 2025 रोजी “सर्वांगीण विकासासाठी शिक्षण” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चेअरमन आर.के. पाटील सर, व्हा. चेअरमन आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रोफेसर नितीन घोरपडे, मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर आणि न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेचे …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची बेळगावला धावती भेट

  बेळगाव : 25 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचे विशेष अधिकारी व महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांची बेळगावला धावती भेट. श्रीनगर येथे आतंकवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांचे प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्या उपचाराची विचारपूस करण्यासाठी व पुढील उपचार चांगल्या …

Read More »

कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात १२ वर्षांची ‘नित्या’ वाघीण दाखल

  बेळगाव : भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात १२ वर्षांची ‘नित्या’ ही वाघीण पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. श्री चामराजेंद्र प्राणी संग्रहालय, म्हैसूर येथून तिला प्राणी अदलाबदल योजनेअंतर्गत येथे आणण्यात आले आहे. १२ वर्षांची वाघीण ‘नित्या’ नुकतीच भुतरामनहट्टीतील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात दाखल झाली आहे. ‘नित्या’च्या आगमनामुळे प्राणी …

Read More »

पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात सर्व पक्षांची एकजुट; सरकारच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा

  नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर आता मोदी सरकारने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु पाणी वाटपाच्या कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात …

Read More »

केदनूरचे सुपुत्र नारायण पाटील यांना मानद डॉक्टरेट बहाल…

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील केदनूर गावातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन स्वतःची एक ओळख निर्माण करून यशाची शिखरे पदाक्रांत करीत विविध बहुमान मिळवणाऱ्या नारायण लक्ष्मण पाटील यांना इंटरनॅशनल ह्युमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीकडून त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. आजपर्यंत अनेक संस्थाना त्यांनी आर्थिक मदत केली आहे. तसेच …

Read More »