Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप तर दोघांना २० वर्षांची सक्तमजुरीची

  बेळगाव : बेळगावमधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात बेळगाव विशेष जलदगती जिल्हा पॉक्सो न्यायालयाने शनिवारी चार आरोपींना दोषी ठरवत दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर दोघांना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. १० मे २०२५ रोजी अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून, मैत्री करून, अपहरण करून सावगाव येथील एका फार्महाऊसवर नेण्यात आले, जिथे …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव

  बेळगाव : दिनांक 23/01/2026 व 24/01/2026 या दोन दिवशी मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषयाचे शिक्षक सुरेश कुंदेकर तर दुसऱ्या दिवशी क्रीडा शिक्षक श्रीधर बेन्नाळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा …

Read More »

कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा जोशपूर्ण सांगता समारंभ उद्या हिंडलगा येथे होणार

  मण्णूर : शिक्षण हेच परिवर्तनाचे खरे साधन आहे, या उदात्त विचारातून गेले सहा ते सात रविवार सातत्याने राबविण्यात आलेली आणि बेळगाव तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रतिष्ठा मिळवून दिलेली कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमाला उद्या हिंडलगा हायस्कूल, हिंडलगा येथे सांगता समारंभाने पूर्णत्वास जाणार आहे. या व्याख्यानमालेत विविध विषयांतील तज्ज्ञ …

Read More »

आडीचा प्रतिक मोरे ठरला गावात पहिला नौसैनिक

  शिक्षकाच्या मुलाची भारतीय नौसेनेत भरारी निपाणी (वार्ता) : आडी (ता.निपाणी) येथील प्रतिक सिद्धू मोरे याची भारतीय नौसेनेत नुकतीच निवड झाली आहे. भारतीय नौसेनेत भरती होणारा प्रतिक हा आडी गावातील पहिलाच युवक असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकचे प्राथमिक शिक्षण आडी मराठी मुलांची शाळा, सौंदलगा हालसिद्धनाथनगर येथे झाले. …

Read More »

बोरगांव सर्कल रुंदीकरणासाठी २.५० कोटींचा निधी

  खासदार प्रियंका जारकीहोळी यांची माहिती; मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : अनेक वर्षापासून बोरगाव सर्कलचे रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम व पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या कामासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. …

Read More »

समाज सारथी सेवा संघाच्या अध्यक्षपदी प्रा. सी. एम. गोरल तर सेक्रेटरी पदी बी. एन. मजुकर

  इतरही पदाधिकाऱ्यांची निवड येळ्ळूर : नेताजी भवन येळ्ळूर येथे समाज सारथी सेवा संघाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बळीराम देसूरकर होते. संघाच्या ध्येय धोरणाची चर्चा झाल्यानेतर सर्वानुमते 11 सदस्यांची कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी बी. एन. मजुकर, उपसेक्रेटरी डॉ. तानाजी …

Read More »

‘कवितेचे पान’ चॅनलवरील हर्षदा सुंठणकर यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

  बेळगाव : ‘आई कुठे काय करते’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्या ‘कवितेचे पान’ या यूट्यूब चॅनलवर नुकतीच हर्षदा सुंठणकर यांची मुलाखत व कविता वाचनाचा विशेष एपिसोड प्रसारित झाला असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. हर्षदा सुंठणकर यांच्या गाजलेल्या ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या कवितासंग्रहाचा हिंदी …

Read More »

परीक्षेच्या रणांगणावर उतरण्यापूर्वीचा आत्मविश्वासाचा संवाद पालक जागर सभेतून प्रकट!

  म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे प्रेरणादायी पालक मेळावा खानापूर : वार्षिक परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना विद्यार्थिनींच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता, भीती व ताण दूर करून आत्मविश्वास जागवणे, अभ्यासाला योग्य दिशा देणे तसेच पालक शिक्षक विद्यार्थिनी यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणे या उद्देशाने म. मं. …

Read More »

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मराठा मंडळ फार्मासी कॉलेजच्या एनएसएसतर्फे अनाथालयास भेट

  बेळगाव : राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून २४ जानेवारी रोजी, मराठा मंडळ फार्मासी काँलेजच्या एनएसएस युनिटच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एनएसएस युनिट व प्रथम वर्ष डी. फार्मा विद्यार्थ्यांनी सुभाषनगर, बेळगाव येथील गंगाम्मा चिक्कुंबी मठ या अनाथालयास भेट दिली. हा कार्यक्रम सहाय्यक प्राध्यापिका तसेच कार्यक्रम प्रमुख प्रा. …

Read More »

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे : किरण जाधव

  बेळगाव : तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन अशी सिंहगर्जना करणाऱ्या भारत मातेचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विद्यार्थ्यांनी विचार आचरणात आणावे आणि आणले पाहिजे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात राष्ट्रप्रेम राहणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या अज्ञानुसार शिक्षण घेत जीवनात यशस्वी ही होणे काळाची गरज आहे, असे उद्गगार …

Read More »