बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने 200 ते 225 कार्यकर्ते दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत, किल्ले रायगड येथे जाण्यापूर्वी …
Read More »मराठा मंडळ ताराराणी हायकूल खानापूरमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती व शारीरिक शिक्षण दिन साजरा
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल खानापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व शारीरिक शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल एन. जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सागर देशपांडे ॲडिशनल कमिशनर- केंद्रीय दक्षता आयोग-कर्नाटक व गोवा विभागप्रमुख तसेच श्री शिवाजीराव पाटील, संचालक, मराठा …
Read More »मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
कैवल्ययोग आश्रम- कुसमळी, जांबोटी रोड येथे मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमानिमित्त वार्षिक सहल व संक्रांतीचे हळदीकुंकू असे आयोजन करण्यात आले होते. विजापूरचे डाॅक्टर प्रशांत कटकोळ यांनी या निसर्गरम्य परिसरात या आश्रमाची उभारणी केली. ध्यान धारणा व योगसाधना सुलभतेने व्हावी या हेतूने ‘प्रशांत कुटीर’ची निर्मिती …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन आज शनिवारी व्ही. एन्. शिवनगी कन्या विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मुख्याध्यापिका मीनाक्षी वडेर यांनी स्वागत केले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे प्रास्ताविक करताना म्हणाले, राष्ट्रीय बालिका दिवस मुलींच्या हक्कांविषयी, सुरक्षिततेविषयी आणि …
Read More »जिल्हा, तालुकास्तरावरील गुणवंतांना लॅपटॉप व ५० हजाराचे प्रोत्साहन
बंगळूर : दहावी (एसएसएलसी) परीक्षा जवळ येत असताना, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. सरकारी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन एसएसएलसी निकालात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने, जिल्हा आणि तालुका पातळीवरील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात …
Read More »प्रजासत्ताक दिनाच्या भाषणावरून राजभवन–सरकार पुन्हा आमनेसामने
केंद्रावरील टीकेचे भाषण वाचण्यास राज्यपालांचा नकार बंगळूर : राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून, यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाच्या मसुद्यावरून राजभवन आणि सरकार आमनेसामने आले आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्पष्ट शब्दांत राज्य सरकारला कळविले आहे की, २६ जानेवारी रोजी देण्यात येणाऱ्या भाषणात केंद्र सरकारवर …
Read More »जीवनविद्या मिशनच्या वतीने विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन
बेळगाव : सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रप्रगती व विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली सोमवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून सुरुवात होऊन किर्लोस्कर रोड, समादेवी मंदिर, राणी चन्नम्मा सर्कल, …
Read More »किल्ले रायगडला अनेक कार्यकर्ते रवाना
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत, मराठी अस्मितेसाठी “लढा नाहीतर गुलामगिरीची सवय होईल” हा नवीन युवकांपर्यंत संदेश घेऊन …
Read More »कानडी पोलिस प्रशासनाची वाकडीच; घेतला “मराठी सन्मान यात्रे”चा धसका!
मागील 70 वर्षांपासून सीमाभागात मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्याबरोबरच मराठी भाषा आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करत असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करत असते. सीमाभागात मराठी भाषा संपवण्यासाठी प्रशासनाने जणू कंबरच कसली आहे. असे असताना युवा समिती सीमाभागच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा आणि मराठी …
Read More »बसुर्ते धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक; तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी
बेळगाव : बसुर्ते येथील धरणासाठी शेतकऱ्यांच्या तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनी संपादित करून बसुर्ते येथे धरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र जमिनी संपादित करून वर्ष लोटले तरी देखील अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. सरकारने या भागातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप ग्रामस्थांच्या वतीने अभियंता राजेंद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta