मथुरा : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. केसी घाटावर भाविकांना घेऊन जाणारी एक बोट तरंगत्या पुलाला धडकून यमुना नदीत उलटली. या बोटीत २० ते २५ भाविक होते अशी माहिती समोर आली असून, यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण अद्याप बेपत्ता …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वाटप
बेळगाव : डी. देवराज अर्स मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने २०२४-२५ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पात्र महिला लाभार्थ्यांना महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शुक्रवारी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. मंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात एकूण १८ लाभार्थ्यांना शिलाई मशीन देण्यात आल्या. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे …
Read More »कसाई गल्ली-भीमज्योती मार्गावर समस्यांचे साम्राज्य
बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असून बेळगावमध्ये मोठ्या उत्सहाने तयारी सुरू आहे. मात्र, शहरातील कसाई गल्ली परिसरातील दुरावस्था अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा पुरावा देत असून, महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांनंतरही कोणतीही कृती न केल्याने संताप व्यक्त होत आहे. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगावमधील कसाई गल्ली मार्गावरून …
Read More »वैद्यकीय सेवेबद्दल बेनाडीतील राजू मधाळे “बेनाडी नगरी” पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रहिवाशी आणि सध्या बेळगाव के.एल.ई. हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेले राजू मधाळे यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल प्रसिद्ध कीर्तनकार, व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते ‘बेनाडी नागरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. येथील जय जवान जय किसान सहकारी संघाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजू मधाळे …
Read More »निपाणीत शनिवारपासून रंगणार ‘अरिहंत’ चषक क्रिकेट स्पर्धा
प्रकाशझोतासह गॅलरीची व्यवस्था; सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील जयंती निमित्त आयोजन निपाणी वार्ता) : बोरगाव येथील सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त, अरिहंत उद्योग समूह व छत्रपती शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवारपासून (ता.११) ‘अरिहंत चषक पर्व -३ – २०२६’ दिवसरात्र टेनिस बॉल आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निपाणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कर्नाटक दलित संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रा. बी. कृष्णाप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती राज्यध्यक्ष गुरूमुर्ती, …
Read More »‘अंकुरम’ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली
कावळे, चिमण्यांसाठी धान्य, पाण्याची सोय निपाणी (वार्ता) : बदलती जीवनशैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईल टॉवर रेंजमुळे कावळे, चिमण्यांसह इतर पक्ष्यांवर परिणाम झाला आहे. त्यांच्या प्रजाती जतन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. चैत्रात नवी पालवी आल्याने शाळेच्या आवारातील झाडांवर पक्षी दिसून येत आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांची भटकंती सुरू आहे. ही बाब लक्षात …
Read More »हरवलेल्या १४ लाख रुपये किमतीचे ९२ मोबाईल पोलिसांकडून जप्त
निपाणी मंडल पोलिसांची कारवाई; मोबाईल परत दिल्याने चेहऱ्यावर फुलले हास्य निपाणी (वार्ता) : निपाणी शहर ग्रामीण आणि बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेल्या १४ लाख रुपये किमतीच्या ९२ मोबाईल पोलिसांनी जप्त केल्या. शिवाय संबंधितांना शुक्रवारी (ता.१०) चिक्कोडीचे पोलीस उपाधिक्षक गोपालकृष्ण गौडर, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह पोलीस …
Read More »बचाव पथकाकडून गरुडाला जीवदान
बेळगाव : येथील फॅमिली कोर्टाचे प्रिन्सिपल जज श्री. जी. व्ही. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानावरून मिळालेल्या तातडीच्या कॉलनंतर एका जखमी गरुडाचा यशस्वी बचाव करण्यात आला. झाडावर धडक दिल्यामुळे हा गरुड जखमी अवस्थेत आढळून आला होता. माहिती मिळताच बचाव पथकातील अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विक्की मेहता, शशिकांत आंबेवाडकर, गौतम श्रॉफ आणि मायकेल …
Read More »एक लाख स्वाक्षरी मोहिमेला नैतिक बळ; श्रीवर्धन तालुका पत्रकार संघाचा पाठिंबा
माणगांव : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळावी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा, या उद्देशाने राज्यभरातील पत्रकार संघटनांकडून ठोस भूमिका घेतली जात आहे. कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील सुमारे ४० लाख मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्याय व दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर या चळवळीला अधिक धार प्राप्त झाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta