Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

शिनोळीत पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरा

  चंदगड (प्रतिनिधी) : शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतना प्रकल्पांतर्गत शिनोळी बु. येथे रामनवमी पारायण सोहळ्यानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पालक तसेच आजी-आजोबा यांचा विधीवत पाद्यपूजन सोहळा भावनिक आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे पालकांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जपणूक यांचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक आप्पाराव …

Read More »

ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा दिलीप मोहिते बारावीच्या परीक्षेमध्ये महाविद्यालयामध्ये प्रथम

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा दिलीप मोहिते ही कर्नाटक राज्यात बारावीच्या परीक्षेमध्ये चौदाव्या स्थानी तर महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत 97.66 टक्के गुण मिळवून प्रथम आलेली आहे. तसेच भौतिकशास्त्र व गणित विषयात पैकीच्या पैकी गुण तिने घेतलेले आहे. चंदगड तालुक्यातील तुडीयेसारख्या …

Read More »

गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा बीम्स रुग्णालयात मृत्यू

  बेळगाव : तुरमरी येथील एका गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा मृत्यू बेळगावमधील बीम्स रुग्णालयात झाला असून याप्रकरणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत नातेवाईकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला आहे. बेळगाव तालुक्यातील तुरमरी येथील इरम्मा शिगीहळ्ळी (वय २१) या गर्भवतीला १० एप्रिल रोजी बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नैसर्गिक प्रसूती …

Read More »

पानिपतकार विश्वास पाटील यांचा साहित्य परिषदतर्फे सत्कार

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांचा राज्याध्यक्ष रवींद्र पाटील तसेच तानाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वसंत व्याख्यानमाला – २०२६ निमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक …

Read More »

संवादिनी वादक पं. सुधांशु कुलकर्णीना कै.पं. अप्पासाहेब जळगावकर पुरस्कार

  बेळगाव : ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. आप्पासाहेब जळगांवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निगडी येथे संवादिनी कला मंच आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरसामन्वय” या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेळगावचे प्रख्यात संवादिनी वादक डॉ. सुधांशु कुलकर्णी यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आणि हार्मोनियमच्या परंपरेत दिलेल्या …

Read More »

मेंदूच्या विकासाचे टप्पे आणि मुलांचे शिक्षण : डॉ. श्रुती पानसे यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव या संस्थांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. “मेंदूच्या विकासाचे टप्पे आणि मुलांचे शिक्षण” या विषयावर प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत प्राथमिक व माध्यमिक …

Read More »

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश केसरकर यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी हलशीवाडी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्षांचा खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार …

Read More »

हलशी-हलशीवाडी येथे लक्ष्मी यात्रेनिमित्त आज भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन

  खानापूर : खानापूर, ता. हलशी-हलशीवाडी येथे लक्ष्मी यात्रेनिमित्त 13 एप्रिल रोजी भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून परिसरातील स्पर्धकमी भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी कै. दत्ता कडगावकर व वंदना कडगावकर यांच्या स्मरणार्थ प्रकाश कडगावकर …

Read More »

शिवजयंती चित्ररथ महामंडळाकडून चित्ररथ मंडळांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शिवजयंती चित्ररथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने रविवारी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौक येथील जत्तीमठ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते. या …

Read More »

खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे आसामच्या मुख्यमंत्र्यांचा तीव्र निषेध

  खानापूर : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि प्रवक्ते पवन खेरा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन केलेल्या विधानाचा खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेली ही भाषा लोकशाही आणि राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी …

Read More »