Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

सलामवाडी येथे श्री हालसिद्धेश्वर (हुग्गी) यात्रा भक्तिभावाने उत्साहात साजरी

  दड्डी (वार्ताहर) : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हालसिद्धेश्वर (हुग्गी) यात्रेचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले आहे. शनिवार दि. 11 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली ही यात्रा रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दि. 11 …

Read More »

बसवजय मृत्युंजय स्वामीजींवरील सर्व आरोप खोटे : तक्रारदार महिलेचा व्हिडिओ प्रसिद्ध

  विजापूर : बसवजय मृत्युंजय स्वामीजींविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या त्रिवेणी नावाच्या महिलेने आता व्हिडिओ प्रसिद्ध करून प्रकरणाला कलाटणी दिली आहे. स्वामीजी निर्दोष असून आपली बदनामी करण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक बनावट तक्रार दाखल केल्याचा दावा तिने केला आहे. स्वामीजींविरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून बदनामी करण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक बनावट तक्रार …

Read More »

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बेनाडीत मंगळवारी मोफत दुचाकी पंक्चर सेवा

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त, मंगळवारी (ता. १४) बेनाडी ते हुपरी, व बेनाडी ते निपाणी या मार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची दुचाकी पंक्चर झाल्यास अशा वाहनांचे मोफत पंक्चर काढून देण्याची सेवा करण्यात आली आहे. पांडुरंग मधाळे यांच्या सहकार्याने श्री सिद्धेश्वर अलायमेंट …

Read More »

बोरगाव टेक्सटाईल पार्कमधील दुर्गंधीयुक्त कारखाना बंद करा

  १५ दिवसांची दिली मुदत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सरकारमान्य टेक्सटाईल पार्क परिसरात सुरू असलेल्या पशु खाद्य व प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामुळे दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले आहेत.या कारखान्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कारखान्यातून सतत येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण दूषित झाले …

Read More »

ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात भीषण टक्कर; 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या!

  मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. …

Read More »

अभ्यासिकामुळे व्यक्तिमत्व विकास शक्य

  तहसीलदार सुरेश मुंजे; निपाणीत ज्ञानज्योती अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक प्रगती आणि जीवनातील यशासाठी ग्रंथालय व अभ्यासिका केंद्रांना महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावल्यास त्यांचा बौद्धिक विकास होण्यासह त्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या युवकांना अशा अभ्यासिका केंद्रांमुळे …

Read More »

संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे

  प्रा. मुकुंद कांबळे : शताब्दी महोत्सव कमिटीतर्फे अभिवादन निपाणी (वार्ता) : भारत देशाची खरी ओळख त्याच्या विविधतेत आणि लोकशाही व्यवस्थेत आहे. या सर्वांचा पाया म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी देणारे हे संविधान आजही आपल्या समाजाला योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब …

Read More »

धार- पवार समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

  सागर पाटील ; निपाणीत समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : अनेक समाजाची मंडळी एकत्रीत येवून समाजाचा विकास साधत आहेत. अशा परिस्थितीमध्ये धार-पवार परिवार विकासात मागे पडत होता. त्यामुळे १३ वर्षापूर्वी श्रीमंतराजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या माध्यमातून ५ लाख धार-परिवाराला एकत्रीत करून त्यांचे जीवन उज्वल करण्याचे काम हाती …

Read More »

मिरवणुकीदरम्यान शिवभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने महापौर, उपमहापौरांना निवेदन सादर

  महापौर, उपमहापौर व नगरसेवक करणार चित्ररथ मार्गाची पाहणी बेळगाव : मंगळवार, दिनांक 21 रोजी होणाऱ्या भव्य-दिव्य शिवजयंती चित्ररथ सोहळा यंदा उत्साहात व सुरळीत पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या कक्षात महापौर प्रीती कामकर व उपमहापौर हणमंत कोंगाली यांना निवेदन …

Read More »

माजी विद्यार्थ्यांनी दिली शाळेला ग्रंथालयाची भेट

  खानापूर : नंदगड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक संत मेलगे शाळेच्या १९८८-८९ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. गेल्या आठ दिवसापासून विद्यार्थ्यांनी श्रमदान व स्वखर्चाने ग्रंथालय खोलीची डागडुजी व रंगकाम करून खोलीचे सुशोभीकरण केले व परिसराची स्वछता केली होती. शनिवार दिनांक …

Read More »