Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार पी. के. बडीगेर यांना “कर्नाटक छाया रत्न” पुरस्कार

Spread the love

 

बेळगाव : गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेले बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार पी. के. बडीगेर यांना “कर्नाटक छाया रत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार १२ जून रोजी सकाळी १० वाजता बंगळूरु येथील पॅलेस ग्राऊंड्समधील त्रिपुरा वासिनी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फोटो टुडे’ प्रदर्शनात प्रदान केला जाईल.

पी. के. बडीगेर यांनी आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या समस्या, सामाजिक घटना, राजकीय घडामोडी आणि विविध क्षेत्रांतील क्षण प्रभावीपणे चित्रित केले आहेत. त्यांच्या या सेवेच्या सन्मानार्थ हा सन्मान दिला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *