Sunday , September 20 2026
Breaking News

मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेसाठी नागरिकांच्या सहकार्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : जिल्ह्यात ३० जून ते ७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मतदार यादीच्या विशेष सर्वांगीण पुनरावलोकन मोहिमेला राजकीय पक्ष आणि नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

सुवर्ण विधानसौध येथे सोमवारी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनासाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली असून, २००२ मधील विशेष पुनरावलोकनाच्या मतदार यादीच्या आधारे बदलांची छाननी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण ४१ लाख २२ हजार ८६९ मतदारांपैकी ३८ लाख २२ हजार ९९० मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, यामध्ये ९३ टक्के प्रगती साधल्याचे त्यांनी सांगितले. शहरीकरण, शिक्षण व रोजगारासाठी होणारे स्थलांतर तसेच मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भूतस्तरीय अधिकारी (बीएलओ) घराघरांत जाऊन गणना अर्ज वितरित व संकलित करतील. मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. कागदपत्रांशिवाय कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. नव्याने नाव नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ भरावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महापालिकेचे उपआयुक्त सिद्धू हुल्लोळी यांनी मोहिमेच्या वेळापत्रकाची माहिती दिली. २० ते २९ जूनदरम्यान प्रशिक्षण व मुद्रण प्रक्रिया होईल, तर ३० जून ते २९ जुलैदरम्यान बीएलओ घरभेटी घेतील. ५ ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. हरकती व सूचनांसाठी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. त्यानंतर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंह तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *