Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात गणेशोत्सवाची सुरुवात! बेळगावच्या राजाचा पाटपूजन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

  बेळगाव : गणेशभक्तांच्या मनात उत्सवाची चाहूल लागली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीला विविध भागात गणेशाची मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारला ऑर्डर देण्यात येत आहे. गुरुवारी गणेश जयंती निमित्ताने बेळगावचा राजा प्रसिद्ध ‘चव्हाट गल्लीतील’ गणपती मंडळाचा पारंपरिक पाठपूजन सोहळा पार झाला. याच संकेताने गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवात होते, त्यामुळे गणेशभक्तांमध्ये या सोहळ्याबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह …

Read More »

‘सिव्हिल’ मधील बाळंतिणींना जायंट्सकडून उबदार कपडे

स्वेटर, कानटोप्यांचे वितरण : वैद्यकीय अधीक्षकांसह मान्यवरांची उपस्थिती बेळगाव : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने जिल्हा रुग्णालयातील गर्भवती व बाळंतीण महिलांना उबदार कपड्यांचे वितरण केले. प्रमुख पाहुणे म्हणून बीम्सचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इराण्णा पल्लेद उपस्थित होते. व्यासपीठावर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोजिनी तिगडी, जायंट्स मेनचे …

Read More »

मोदगा भावेश्वरी देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक

  दड्डी : मोदगा (ता. हुक्केरी) येथील भावेश्वरी यात्रेनिमित्त नियोजन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती हुक्केरी तालुका तहसीलदार श्री. बलराम कट्टीमनी यांच्यासह यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे 2, 3, 4 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी बैठक होती. बैठकीच्याअध्यक्षस्थानी भावेश्वरी देवी …

Read More »

सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक उमेदवारांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटक नागरी सेवा पदांसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना नियमांनुसार यासोबतच आणखी ५ वर्षांची सूटही लागू राहणार आहे. ही …

Read More »

राज्यपालांचा सरकारचे भाषण न वाचताच सभागृहातून काढता पाय

  संयुक्त अधिवेशनात अभूतपूर्व गदारोळ बंगळूर : राज्य विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात आज अभूतपूर्व राजकीय नाट्य पाहायला मिळाले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सरकारने तयार केलेले भाषण पूर्णपणे न वाचता, स्वतः तयार केलेल्या काहीच ओळी वाचून सभागृहातून बाहेर पडल्याने मोठा गदारोळ झाला. यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप-धजद यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीकडून मराठी सन्मान यात्रेस पाठिंबा

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म ए समितीकडून मराठी सन्मान यात्रेचे प्रमुख नेते शुभम शेळके यांचे जल्लोषत स्वागत येळ्ळूर येथील शिवसेना चौक येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा व बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी येळ्ळूर विभाग …

Read More »

महिला आयोगाच्या अध्यक्षा कोल्हापूरात; “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती कार्यक्रम

  कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शुक्रवारी कोल्हापूर मध्ये आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या क्षमता बांधणी कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या …

Read More »

डीजीपी रामचंद्र राव यांची हकालपट्टी करा: भाजप महिला मोर्चाची मागणी

  बेळगाव : अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डीजीपी रामचंद्रराव यांना केवळ निलंबित न करता सेवेतून थेट बडतर्फ करावे, या मागणीसाठी आज भाजप महिला कार्यकर्त्यांनी शहरातील राणी चन्नम्मा चौकातून सुरू झालेली ही निषेध रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज सकाळी जमलेल्या भारतीय जनता पक्ष बेळगाव …

Read More »

सांगलीत माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

  सांगली : मागील महापालिका निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार समोर आले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीत माजी मंत्री व आमदार जयंत पाटलांचे वडील दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकाराने सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील …

Read More »

हलगा-मच्छे बायपासच्या कामाला शेतकऱ्यांचा पुन्हा विरोध

  बेळगाव : शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळून सुरू असलेले हलगा-मच्छे बायपासचे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बेळगावमध्ये या बायपासच्या कामावरून शेतकरी आणि कंत्राटदार यांच्यात जोरदार वादावादी झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावमध्ये हलगा-मच्छे बायपासच्या कामाला शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवला …

Read More »