Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

इंगळी मारहाण प्रकरण : कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पीएसआय निलंबित

  बेलगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी हुक्केरी पोलिस स्थानकाचे पीएसआय निखिल कांबळे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. २६ जून रोजी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायी घेऊन जाणारे वाहन पकडून पोलिस ठाण्यात आणले. यावेळी गुन्हा …

Read More »

डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या

  आमदार इक्बाल हुसेन; १०० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा बंगळूर : राज्यात नेतृत्व बदलाची मागणी तीव्र झाली आहे, रामनगरचे काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांनी उघडपणे डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, शिवकुमार यांना पाठिंबा देणारे १०० आमदार मुख्यमंत्र्यांमध्ये बदल घडवू इच्छितात, अशी मागणी केली आहे. त्यांना सुशासन हवे आहे आणि डीके …

Read More »

मुख्यमंत्री बदलाबाबत आमदार, खासदारांशी चर्चा नाही

  रणदीप सिंह सुरजेवाला; बैठकांचा सपाटा सुरूच बंगळूर : राज्यातील नेतृत्व बदलावर अभिप्राय गोळा करण्याची शक्यता एआयसीसीचे सरचिटणीस आणि पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी मंगळवारी फेटाळून लावली. दरम्यान, सुरजेवाला यांनी आमदारांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाचा अहवाल व त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याचे काम आज दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे. …

Read More »

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि विनयभंग प्रकरणी दोन आरोपींना पाच वर्षाची सक्तमजुरी

  बेळगाव : राजकीय संघर्षातून तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मोटारसायकलवरून घेऊन जाऊन तिचा विनयभंग करण्यात आल्याच्या प्रकरणात, बेळगाव येथील विशेष जलदगती पॉक्सो न्यायालयाने दोन आरोपींना प्रत्येकी ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २०२१ मध्ये हुलकुंद गावाजवळ घडली. काटकोळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या …

Read More »

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान समारंभ ४ जुलै रोजी

  बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान समारंभ शुक्रवार ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृह ज्ञान संगम, येथे होणार आहे. याद्वारे २५ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाचा पहिला भाग आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एस. विद्याशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकचे राज्यपाल …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका, युवा समिती निपाणी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा व रेणुका मंदिर येथील उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा तसेच हालसिद्धनाथ मंदिर येथील उच्च प्राथमिक मुलींची शाळा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

समाजात परिवर्तन घडवण्याची जबाबदारी माध्यमांची : राजयोगिनी ब्रह्माकुमारी अंबिका दीदी

  बेळगाव : जगात आज सर्वत्र अशांतता पसरली आहे. अशावेळी सर्वांना शांती सदभावनेची गरज असून, समाजात परिवर्तन घडवण्याची जबाबदारी माध्यमांची असल्याचे प्रतिपादन,प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव विभाग प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी अंबिका दीदी यांनी बोलताना केले. अनगोळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शांती भवन येथे आज मंगळवारी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे “डॉक्टर दिन” साजरा

  बेळगाव : डॉक्टर दिनाच्या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे मलप्रभा हॉस्पिटल येथे एक कार्यक्रम करण्यात आला. या वेळी डॉ. महांतेश वाली आणि डॉ. स्वेता वाली यांचा वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. दोन्ही डॉक्टरांना स्मृतीचिन्ह, फुले, गोडधोड आणि भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आला. त्यांनी जायन्ट्स सर्व सदस्यांचे मन:पूर्वक …

Read More »

महापौर आणि नगरसेवक सदस्यत्व रद्दतेबाबत उच्च न्यायालयाची स्थगिती!

  बेळगाव : बेळगावचे महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरवण्याच्या प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अंतिम सुनावणी सोमवारी होणार आहे. निवडणुकीपूर्वी मंगेश पवार व जयंत जाधव यांनी आपल्या पत्नींच्या नावे खाऊ कट्ट्यात गाळे घेतल्याचे सिद्ध झाले होते. महानगरपालिकेवर …

Read More »

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड

  मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले असून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. वरळीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. अन्य कोणीही अर्ज न …

Read More »