Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

‘रयत’मध्ये गुणवत्तेला प्राधान्य; विश्वनाथ पाटील

  कुर्ली हायस्कूमध्ये पालक प्रबोधन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून पोकळ जाहिराती करुन पालकांची दिशाभूल केली जात आहे. पण रयत शिक्षण संस्थेने गुणवत्तेला प्राधान्य देत ग्रामीण भागात उत्तम शिक्षणाची कवाडे खुली केली असल्याचे मत माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव परिवारतर्फे पाणपोईची सोय

  बेळगाव : वाढत्या उष्णतेने नागरिक त्रस्त असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी जायंट्स ग्रुपतर्फे पाणपोईची सोय करण्यात आली आहे. हलगेकर जनरल स्टोअर्स बसवेश्वर सर्कल खासबाग येथे पाणपोईचे उदघाटन हलगेकर जनरल स्टोअर्सचे मालक कृष्णा हलगेकर, व्यापारी बंधू मंडळाचे अध्यक्ष दिनेश मेलगे, बंडू बामणे, सचिन कणुकले, गदग्याप्पा नागनवर, श्रेयश दश्वी, अनवीत शिंदे यांच्या …

Read More »

सीमाभागाने अभ्यासू, निर्भीड, लढवय्या नेता गमावला; सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच दीपक दळवी यांना श्रद्धांजली ठरेल!

  बेळगाव : सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी नेहमी कटिबद्ध असलेले, मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी झटत प्रत्येक आंदोलनातील दळवी यांचे कार्य सीमा भागातील युवकांना नेहमीच प्रेरणा देणारे होते. सीमा प्रश्नासाठी केलेला त्याग सर्वांनाच नेहमी स्मरणात राहील. सीमाभागाने एक अभ्यासू, निर्भीड, लढवय्या नेता गमावला. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच दीपक दळवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, …

Read More »

अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

  मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी बातमी हाती आली आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले आहे. अशोक खरातच्या अश्लील कृत्याने राज्यभरात संताप व्यक्त …

Read More »

बेळगांव शहर जिल्हा सेवा समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रा

    बेळगाव : बेळगांव शहर जिल्हा सेवा समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी श्री क्षेत्र नाणीजधाम यांच्या प्रेरणेतून आणि रामानंद संप्रदाय जिल्हा बेळगांव शहर यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्याच्या निमित्ताने बेळगांव शहर बस्तवाड आरती केंद्र येथे मिरवणूक काढण्यात …

Read More »

शेडेगाळी येथील शेतकऱ्याचा हालात्री नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : तालुक्यातील शेडेगाळी गावात आज शुक्रवारी (ता. 20) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. देवाप्पा महादेव गुरव (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. माहितीनुसार, देवाप्पा गुरव हे आपल्या मुलासह सकाळी शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते. मुलाने पंपसेट सुरू केल्यानंतर घरात …

Read More »

खानापूर तालुका समितीची मासिक बैठक व दिवंगत दीपक दळवी यांची श्रद्धांजली सभा रविवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने मासिक बैठकीचे आयोजन तसेच मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचेही आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक व शोकसभा रविवार दि. 22 मार्च 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता राजा शिवछत्रपती शिवस्मारक येथे होणार आहे. …

Read More »

बिजगर्णी ग्राम पंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही हिंमत असेल तर खात्री करून घ्यावी

  माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांचे प्रतिउत्तर बेळगांव (प्रतिनिधी) : बिजगर्णी ग्राम पंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी विरोधकांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले. बोलताना पुढे ते म्हणाले बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बेळगाव तालुक्यात …

Read More »

येळ्ळूर म. ए. समितीच्यावतीने दीपक दळवी यांची उद्या शोकसभा

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सीमाभागाचे ज्येष्ठ नेते माननीय कै. दीपक अर्जुनराव दळवी यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने शनिवार दि. 21 रोजी ठीक 7-30 वा. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्री चांगळेश्वरी मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोकसभेला आजी – माजी जि. प. सदस्य, ता. …

Read More »

गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री समादेवी देवस्थानात वार्षिक गाऱ्हाणे; मान्यवरांचा सत्कार

  बेळगाव : श्री समादेवी देवस्थान, शहापूर तर्फे गुढीपाडव्याच्या निमित्ताने वैश्यवाणी समाजाचे आराध्यदैवत श्री समादेवीला वार्षिक गाऱ्हाणे घालण्यात आले. समाजाच्या सुख-शांतीसाठी पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमानंतर कोसंबीर व पन्ह्याच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. याचबरोबर वार्षिक शिमगोत्सव व नववर्ष स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ उत्साहात पार …

Read More »