Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वानुमते बिनविरोध करण्यात आल्या. त्यामध्ये अध्यक्षपदी भास्कर स्वामी, उपाध्यक्षपदी फिरोजखान इनामदार महिला उपाध्यक्षपदी लता इंदलकर, कार्यदर्शीपदी मुबारक जैनापुरे, खजिनदार शिल्पा भुसाणी ‘सहकार्यदर्शीपदी संतोष पाटील, सुवर्णा कांबळे, संघटना कार्यदर्शीपदी वाय. टी. पाटील, अर्चना कोठरे( महिला) यांचा समावेश आहे.
नूतन अध्यक्ष भास्कर स्वामी यांनी, तालुक्यातील शिक्षक संघाच्या सर्व सदस्यांनी आपल्यावर आदेश पदाची जबाबदारी सोपविली आहे. या पुढील काळात त्यांच्या विश्वासाला पात्र राहून शिक्षक संघटनेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या निवडी बिनविरोध करण्यासाठी प्रकाश चव्हाण, सुनील शेवाळे, दीपक मधाळे, राज्य सरकारी नोकर संघाचे संजीव खामकर, रविंद्र तराळ, बापू शितोळे, मुख्याध्यापक एन. जी. अत्तार, अजित गोरवाडे, एस. के. मगदूम, पी. एस. पाटील, धनंजय ढोबळे, अनिल शिरगावे, प्रकाश हेगडे, महादेवी कोळी यांच्यासह सुकाणू कमिटी सदस्यांच्या संचालक आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *