Sunday , July 26 2026
Breaking News

घरकुल योजनेतील यादीतील गोंधळामुळे निपाणीची प्रतिमा मलिन : माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर

Spread the love

 

पंधरा दिवसात घरकुल वाटप न केल्यास आंदोलन

निपाणी( वार्ता) : घरकुल योजनेची लाभार्थींना घरकुल वाटपाबाबत बैठक घेण्यासाठी २०१८ साली आमदारांना पत्र दिले होते. पण त्यांनी बैठक न घेतल्याने आपण राजीव गांधी हाउसिंग सोसायटी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन घरकुल लाभार्थ्यांची निवड करण्याची मागणी केली. शिवाय तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन यादीला मंजुरी मिळवली. पण लोकप्रतिनिधींनी ती यादी बदलून वेगळी यादी केली. त्यामुळे खरे लाभार्थी बाजूला गेले. त्यामुळे घरकुल वाटप ड्रॉ वेळी गोंधळ झाल्याने शहराला कलंक लागला आहे. सध्या असलेल्या यादीची पडताळणी करून १५ दिवसात घरकुल वाटप प्रक्रिया सुरु न केल्यास सामाजिक कार्यकर्ते, सहकारी नगरसेवक आणि लाभार्थ्यांना घेऊन नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिला. शुक्रवारी (ता.२२) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
गाडीवड्डर म्हणाले, सध्याच्या लोकप्रतिनिधींनी एकही शाश्वत भरीव काम केलेले नाही. नऊ वर्षाच्या काळात केवळ सारखेच पाहिला आहे. याशिवाय सरकारी जमिनीवर डोळा ठेवून राजकारण सुरू आहे. गोंधळाच्या वेळी एकमेकांचे संगनमत करून लाभार्थ्यांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. घरकुल वाटप कार्यक्रम म्हणजे केवळ ड्रामेबाजी झाली आहे. आपण प्रशासनावर आणलेल्या दबावामुळे मंजूर झालेल्या यादी मधील नावे कमी करण्यात आले आहेत.
मतदारांनी लेखीला निवडून दिले असले तरी जावयाला बाजूला काढले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत लक्ष्मण चिंगळे यांच्या संगनमतामुळेच अण्णासाहेब जोल्ले बँकेचे अध्यक्ष झाले आहेत. दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी यांनी विविध उपनगरे वसविली आहेत. याउलट आमदार जोल्ले यांनी घरकुल लाभार्थीकडे दुर्लक्षच केले आहे. १५ दिवसात या दिवशी पडताळणी करून योग्य लाभार्थ्यांना घरकुल वाटप करावे. अन्यथा लाभार्थी व सहकार्यासमवेत नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी माजी सभापती बाळासाहेब देसाई -सरकार, संभाजी गायकवाड, विनोद चोरगे, अजित पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
——————————————————————–
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पट्टणकुडी गाव परिसरात निपाणी महानगरपालिका आणि राजीव गांधी गृहनिर्माण महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच अंतर्गत, २०/०५/२०२८ रोजी झालेल्या निवारा समितीच्या बैठकीद्वारे लाभार्थ्यांना जी+२ प्रकारची गट घरे वाटप केली जाणार होती, परंतु लाभार्थ्यांच्या निवडीपूर्वी काँग्रेस आणि भाजप पक्षांच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यास सरकारने लाभार्थ्यांची यादी तयार करून गोंधळ घातला. याबद्दलची माहिती मिळावी यासाठी विलास गाडीवड्डर यांनी नगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *