बेळगाव : बेळगाव शहरात सायबर गुन्हेगारांनी आपले जाळे पसरवले असून तब्बल २ हजार ९९२ ‘म्युअल अकाउंट्स’द्वारे व्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना या रॅकेटचा पर्दाफाश केला.शहरात सध्या २ हजार ९९२ म्युअल अकाउंट्स सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले …
Read More »पिरनवाडी येथील एकाला गांजा विक्री प्रकरणी अटक
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतून माळ येथे गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागातून गांजा आणून बेळगावमध्ये विक्री केली जात होती. सीसीबीचे पोलीस निरीक्षक …
Read More »माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी घेतली दीपक दळवी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांची आज शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपले आयुष्य वेचणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे झुंजार व्यक्तिमत्त्व असलेले अध्यक्ष दीपक दळवी यांचे गेल्या मंगळवारी वयाच्या 84 व्या …
Read More »न्यायाधीश प्रियांका राजगोळकर यांचा सत्कार
बेळगाव : शाहूनगर, बेळगाव येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर यांची दिवाणी न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल शाहूनगरवासियांतर्फे अभिनंदन करून नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. शाहूनगर येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर -बेकवाडकर यांनी दिवाणी न्यायाधीश परिक्षा उत्तम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. या पद्धतीने न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल प्रियांका यांचे त्यांच्या …
Read More »श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानमध्ये गुढी पाडवा उत्साहात साजरा
बेळगाव : हिंदू नववर्ष व गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आज पहाटेपासून मंदिर परिसरात सनई-चौघड्यांच्या मंगल ध्वनीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या पावन दिनानिमित्त रुद्राभिषेक व पंचांग पूजन विधी पार पडले. त्यानंतर मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे …
Read More »कुटुंबाचा त्याग करून कांशीरामांनी समाजाला वेगळी दिशा दिली
ॲड. राजेंद्र थरकार; मानकापूर येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम निपाणी (वार्ता) : बहुजन समाजाचे नायक कांशीराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतभर सायकलने प्रवास करून बहुजन समाजापर्यंत तळमळीने पोहोचविले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची ध्येयधोरणे युवकांना पटवून दिली. कांशीराम यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून ‘बँक बॅलन्स झिरो’सारखे अनेक उपक्रम राबविल्याचे जस्टीस …
Read More »मंत्री संतोष लाड यांची भेट घेऊन सुप्रिया पाटील यांची विविध विषयावर चर्चा
निपाणी (वार्ता) : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या आणि कर्नाटक राज्य महिला जनरल सेक्रेटरी सुप्रिया दत्ताकुमार पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांची बेंगलोर येथे भेट घेऊन निपाणी मतदारसंघातील विविध समस्यावर चर्चा केली. विशेष म्हणजे उन्हाळ्यातील पाणीटंचाई व इतर महत्त्वाच्या बाबीवर त्यांनी प्रकाश झोत टाकला. यावेळी मंत्री लाड …
Read More »नूतन मराठी विद्यालयात सातवीमधील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नूतन मराठी विद्यालयात विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव विक्रमादित्य धुमाळ, मुख्याध्यापक एस. एस. पचंडी, एम. डी. खोत उपस्थित होते व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन …
Read More »बसस्थानकाला वडाप वाहनासह अतिक्रमणाचा विळखा
व्यवसायिकांचेही दुतर्फा अतिक्रमणे; प्रवाशांसह दुचाकी वाहनधारकांची कसरत निपाणी (वार्ता) : दररोज हजारो नागरिकांसह वाहनांची वर्दळ येथील बसस्थानक परिसरात असते. ग्रामीण आणि शहरातील नागरिकांसाठी बसस्थानक जोडणारे रस्ते सातत्याने गर्दीने फुलून जात आहेत. तरीही रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिक आणि वाहनधारक हैराण झाले आहेत. त्यामुळे बसस्थानकाला अतिक्रमणांचा वेढा पडल्याची स्थिती आहे. …
Read More »विद्युत भारीत वाहिनीच्या स्पर्शाने मृत्यू झालेल्या ढोणेवाडीतील विद्यार्थ्याच्या वारसाला पाच लाखाची मदत
निपाणी (वार्ता) : शाळेच्या खेळत असताना झाडातून गेलेल्या विद्युत प्रवाहित वाहिनीच्या स्पर्श झाल्याने ढोणेवाडी येथील विद्यार्थी बद्रीनाथ प्रकाश सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता. संबंधित कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी हेस्कॉमकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सूर्यवंशी कुटुंबीयांना ५ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला. या रकमेचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta