बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने वडगाव चावडी गल्ली येथे कुपनलिका खोदण्यात आली. मात्र कुपनलिका खोदून या ठिकाणची माती गटारीतच पडून राहिली आहे. त्यामुळे गटारीतून पाण्याचा निचरा होत नाही. साचून राहिलेल्या घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेविका रेश्मा कामकर यांच्याकडे तक्रारही नोंदवली. दरम्यान वीस दिवस उलटूनही गटारीतील …
Read More »मुख्यमंत्र्यांनी उद्याच नवीन जिल्ह्याची घोषणा करावी : खास. इराण्णा कडाडी
बेळगाव : बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. शनिवारी बेळगावात येत असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवीन जिल्ह्यांची घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. शुक्रवारी बेळगाव प्रवासी मंदिरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. बेळगाव हा मोठा जिल्हा असून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी आहे. अनेकदा निवेदन …
Read More »पीक नुकसानीची भाजप नेत्यांनी केली पाहणी
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी भागात मुसळधार पावसामुळे गाजर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. “पिकांच्या नुकसानीमुळे आम्ही मोठ्या अडचणीत आहोत, मात्र आमची व्यथा ऐकण्यासाठी मंत्री किंवा …
Read More »चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर
चंदगड : चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर मजरे कर्वे, (ता.चंदगड जि.कोल्हापूर) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश बांदिवडेकर उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करून,संस्थेच्या पुढील सन 2025 ते 2030 या कालावधी करिता नूतन कार्यकारिणी मंडळाची बहुमताने व …
Read More »सेक्स टॉय, पॉर्न सीडी, मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स…; स्वामी चैतन्यानंदचे धक्कादायक कारनामे
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चैतन्यानंदने १७ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असून चैतन्यानंदला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. मात्र, या चैतन्यानंदचे अनेक धक्कादायक कारनामे आता समोर आले आहेत. सेक्स टॉय, पॉर्न सीडी …
Read More »२६/११ मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या एनएसजी कमांडोला २०० किलो गांजासह एटीएसकडून अटक
मुंबई : अंमली पदार्थ विरोध पथक (एएनटीएफ) आणि राजस्थान दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या दोन संस्थांनी संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी बजरंग सिंगला अटक केली. बजरंग सिंग हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी कमांडो होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान तो मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केलेल्या एनएसजीच्या कारवाईत …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिरात सीमोल्लंघन उत्साहात संपन्न
बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिरमध्ये दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला. आज सायंकाळी वडगाव, जुने बेळगाव व अनगोळ भागातून आलेल्या पालख्यांचे व हजारो भक्तांचे स्वागत मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सहकारी यांनी केले. उशिरापर्यंत परिसरातील नागरिकांनी सीमोल्लंघनाचा आनंद लुटला.
Read More »सदलग्यातील पदपथाचा (फूटपाथचा) वापर मेंढरांकडून; शालेय विद्यार्थ्यांचे फूटपाथकडे दुर्लक्ष
सदलगा : हे आहे एक अत्यंत मार्मिक आणि बोलके छायाचित्र. सदलग्यातील या फोटोतील मेंढपाळ त्या पदपथाच्या कठड्याबाहेरुन जात आहे आणि त्याची सगळी मेंढरं संरक्षक कठड्याच्या आतील पदपथावरुन त्यांच्या त्यांच्या शिस्तीने जात आहेत. आणि दुसऱ्या फोटोत कांहीं शालेय मुले फूटपाथ सोडून मुख्य रस्त्यावरुन गटागटाने जात आहेत. मनुष्य प्राण्याला निसर्गाने अत्यंत …
Read More »वडगावमध्ये भटकी व पाळीव कुत्र्यांना रेबीज लसिकरण
बेळगाव : वडगाव पशुचिकित्सालयातर्फे सरकारच्या आदेशाप्रमाणे सर्व कुत्र्यांना रेबिजचे लसिकरण करुन जनतेला भयापासून मुक्त करा असा आदेश आल्याने आज गुरुवार दि. 2/10/2025 रोजी सकाळी मनपा कर्मचारी तसेच वडगाव पशुचिकित्सालयाचे मुख्य डॉक्टर कट्याण्णावर तसेच सहकारी डॉक्टरांच्या मदतीने वडगावमध्ये फिरणाऱ्या भटकी कुत्री तसेच घरी पाळलेल्या कुत्र्यांना रेबिज लसिकरण करण्यात आले. यामुळे …
Read More »दोनशे वर्षांची परंपरा लाभलेला शहापूरचा श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिभावात
बेळगाव : विजयादशमी निमित्त बेळगाव आणि शहापूरच्या दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. शेकडो भक्त रथोत्सवात सहभागी झाले होते. वेंकट रमण गोविंदा, गोविंदा असा जयघोष करत भक्त रथ ओढत होते. रथाच्या मार्गांवर सडे घालून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकाठिकाणी सुहासिनी रथाला आरती करत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta