Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

शहरी भागात दर २५ दिवसांत, ग्रामीण भागात ४० दिवसांनी सिलेंडरचा पुरवठा

  व्यावसायिक वापरकर्त्यांना गेल नोंदणी अनिवार्य: राज्य सरकार बंगळूर : राज्यात निर्माण झालेल्या तीव्र एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरकर्त्यांनी आपल्या नेहमीच्या वापराच्या केवळ २० टक्के गॅसमध्येच कामकाज चालवावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांनी सोमवारी दिले. गॅस सिलेंडरच्या प्रश्नासंदर्भात आज अन्न विभागाच्या कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

पावसाळ्यापूर्वीच मांगुर फाट्यावरील पिल्लर उभारणी

  पश्चिमेकडून वाहतूकीचा मार्ग मोकळा : वेदगंगा नदीकाठाला यंदा दिलासा निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. मांगुर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पुल हा सीमाभागातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या लढ्यामुळे भरावाऐवजी पिल्लरचा होत आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाची साथ मिळाल्यास येत्या पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील बाजूची पिल्लर उभारणीचे …

Read More »

जागतिक वन दिनानिमित्त यरनाळमध्ये भूमी वात्सल्य फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण

  निपाणी (वार्ता) : जागतिक वन दिनानिमित्त भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनतर्फे यरनाळ येथील गायरान परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भारतीय वंशाच्या विविध वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली करण्यात आली. सुरेश घाटगे यांनी स्वागत करून पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. या उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, महोगणी, उंबर, करंजी …

Read More »

येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली दीपक दळवी साहेबांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

  येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंबीर नेतृत्व आणि सीमा लढ्यातील झुंजार व्यक्तिमत्व दीपक दळवी साहेब यांच्या निधनामुळे सीमाभागावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगात दळवी कुटुंबाला आधार देण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेण्यात आली. या प्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवंगत दीपक दळवी …

Read More »

२०२१ मोर्चा खटल्याची तारीख २४ मार्च रोजी; खटल्यातील कार्यकर्त्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन

  बेळगाव : २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा पोलिसी बळावर धर्मवीर संभाजी महाराज चौकात अडविण्यात आला. यावेळी समिती व कार्यकर्त्यांनी चौकातच धरणे धरले तसेच आपल्या मागण्यांवर ठाम राहून घोषणाबाजी केली. या मोर्चावर पोलिसांनी कोरोना काळाचे निमित्त …

Read More »

काँग्रेसच्या योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले

  सुप्रिया पाटील; तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीतील जाहीरनाम्यांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे तीन वर्षापासून राज्यातील जनतेला त्याचा लाभ होत आहे. अद्यापही अनेक योजना राज्य शासनाकडून अंमलात आणल्या जात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहून पक्ष बळकटीसाठी संघटितपणे कार्य …

Read More »

ओमनगरजवळ दुचाकीस्वार युवती थोडक्यात बचावली!

  बेळगाव : ओल्ड पीबी रोडवरील ओमनगरच्या वळणावर सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवती थोडक्यात बचावल्याची घटना घडली. जुने बेळगावकडून येणारी टिप्पर ओमनगरकडे वळत असताना हा अपघात झाला. समोरून येणारी दुचाकी टिप्परच्या मागील चाकाखाली अडकली. मात्र, सुदैवाने दुचाकीस्वार युवती बाजूला पडल्याने तिचा जीव वाचला, तर दुचाकी चाकाखाली आली. अपघातानंतर टिप्पर …

Read More »

बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधींची फसवणूक; बेळगाव जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, संशयास्पद बँक खात्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीपी सीआयडी कार्यालयाच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यात तब्बल १४०० संशयास्पद बँक खात्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. सोमवारी आयोजित पत्रकार …

Read More »

निपाणीतील जुन्या पी. बी. रोडचे शिवाजी महाराज रोड नामकरण करा

  नागरिकांची मागणी; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महत्त्वाच्या असलेल्या बेळगाव नाका ईदगाह मैदान ते कोल्हापूर वेस या रस्त्याला पुणे- बेंगलोर रोड म्हणून ओळखले जाते. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आता शहराबाहेरून सर्व वाहने जाणार आहेत. त्यामुळे पूर्वीच्या जुन्या पी. बी. रोडला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे. शिवाय कोल्हापूर …

Read More »

आनंदनगर उत्कर्ष महिला मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

  बेळगाव : उत्कर्ष महिला मंडळ आनंदनगर वडगाव यांची नुकताच बैठक घेण्यात आली आणि सन 2026-27 ते 2029-30 सालाकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळत्या अध्यक्षा सुनीता पाटील या होत्या. महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. शुभांगी प्रभाकर पाटील, उपाध्यक्षपदी सौ. चंदा परशराम घाडी, तर सेक्रेटरी पदी सौ. शिवानी उमेश …

Read More »