निपाणी (वार्ता) : कायदा व नियमाच्या चौकटीत बकरी ईद सणाचे महत्त्व जोपासून हा सण शांततेत साजरा करा. हिंदू मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा जोपासावा, असे आवाहन पोलीस उप निरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी केले. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. निपाणी परिसरात अनेक सण उत्सव हिंदू-मुस्लिम बांधवांच्यावतीने …
Read More »रायबाग तालुक्यात भीषण अपघात होऊन चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोम्मनल गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महंतेश, त्यांची पत्नी साक्षी आणि त्यांचे ९ महिन्यांचे बाळ हे तिघे दुचाकीवरून रायबाग रेल्वे स्थानक परिसरातून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची एका ऑटोरिक्षासोबत जोरदार …
Read More »बेळगाव महापालिकेला २ जूनपर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा ‘कर्नाटक बंद’चा इशारा : वाटाळ नागराज
बेळगाव : बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे तसेच महाजन आयोग अहवालाच्या अंमलबजावणीचा ठराव २ जूनपर्यंत बेळगाव महानगरपालिकेत मंजूर करावा, अन्यथा ४ जून रोजी बंगळुरूत बैठक घेऊन अखंड कर्नाटक बंदची हाक दिली जाईल, असा इशारा ज्येष्ठ कन्नड चळवळीचे नेते वाटाळ नागराज यांनी दिला. बेळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना वाटाळ नागराज …
Read More »महापालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाटाळ नागराज यांच्यासह अनेक कन्नड समर्थक कार्यकर्ते ताब्यात
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी विविध कन्नड समर्थक संघटनांनी आज महापालिकेवर घेराव घालण्यासाठी आंदोलन छेडले असता पोलिसांनी वाटाळ नागराज यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात अनेक कन्नड संघटनांचे समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी …
Read More »अधिक मासानिमित्त निपाणी परिसरात जावई बापूंच्या आदरतिथ्याची लगबग
निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या अधिक मासानिमित्त सध्या निपाणी परिसरात घरोघरी जावईबापूंच्या आदरातिथ्याची लगबग सुरू आहे. या महिन्यात जावयाला आंब्याच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद देत विविध प्रकारचे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार जावयाला विष्णूरूप मानून घरी जेवण देण्यासह आर्थिक कुवतीनुसार तांब्याचे ताम्हण, …
Read More »निपाणी तालुक्यात ९८ टक्के पाठ्यपुस्तके दाखल
निपाणी तालुक्यातील ५२ हजार ७५७ विद्यार्थ्यांना लाभ; उन्हाळी सुट्टीतच वाटप सुरू निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील पाचवी ते दहावी वीच्याविद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी शासनातर्फे शिक्षण खात्याने मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळावा, यासाठी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने केलेल्या नियोजनानुसार पाठ्यपुस्तकांची पहिली गाडी शहरात दाखल झाली आहे. त्यानुसार, शाळाशाळांमध्ये या पुस्तकांचे सुयोग्य …
Read More »बेळगाव महापालिकेला आज कन्नड संघटनांचा घेराव; बेळगावातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी विविध कन्नड समर्थक संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दि. २६ रोजी बेळगाव महापालिका कार्यालयावर घेराव घालणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कन्नड सेना–कर्नाटक, कित्तूर कर्नाटक सेना, गडीनाड कन्नडिगा सेना, कन्नड क्रिया …
Read More »इंधन दरवाढ कायम; बेळगावात पेट्रोल ११०.७४ तर डिझेल ९८.६९ रुपयांवर
बेळगाव : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. सलग काही दिवसांपासून इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने वाहनधारकांच्या खर्चात वाढ झाली असून, त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरही होताना दिसत आहे. सध्याच्या दरानुसार बेळगावात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ११०.७४ रुपये, तर डिझेलचा दर ९८.६९ रुपये इतका झाला आहे. नव्या …
Read More »कपिलेश्वर मंदिर परिसरात आता “ड्रेस कोड”; धार्मिक पवित्रता आणि शिस्त राखण्यासाठी निर्णय
बेळगाव : कपिलेश्वर मंदिर परिसरातील धार्मिक पवित्रता, शिस्त आणि पारंपरिक वातावरण कायम राखण्यासाठी भाविकांसाठी आत्ता “ड्रेस कोड’ नियम लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने अयोग्य पोशाखात येणाऱ्या भाविकांवर निर्बंध घालण्यासाठी परिसरात सूचना फलक उभारले असून यासंदर्भात जनजागृती मोहीमही सुरू केली आहे. अलीकडे काही भाविक पाश्चिमात्य पोशाखात मंदिरात येत …
Read More »उद्या सकाळी ११ वाजताचा मुहूर्त ठरला; सर्व गोंधळ संपेल : मंत्री सतीश जारकीहोळी
बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील कथित सत्तासंघर्षाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या काल संध्याकाळी दिल्लीला गेले असून सकाळी पक्षाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta