चाव्यासह विविध प्रकारच्या रंगसंगती; आधुनिक माठांकडे नागरिकांचा कल निपाणी (वार्ता) : यावर्षी मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाचा तडाका वाढला असून उष्मा वाढत आहे. त्यापासून गारवा मिळवण्यासाठी नागरिक थंड पाण्यास पसंती देत आहेत. परंतु फ्रिजपेक्षा माठातील पाणी आरोग्यास आयुक्त असल्याने शहर व ग्रामीण भागात माठांना मागणी वाढली आहे. पण स्थानिक माठावर …
Read More »झीरो एफआयआर दाखल करण्याचा कर्नाटकला अधिकारच नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी कर्नाटक राज्यात झिरो एफआयआर दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन अजितदादांना न्याय मिळू शकला नाही, अशी खंतही रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर …
Read More »खाद्यतेल दराचा भडका!
युद्धाची झळ स्वयंपाकघरापर्यंत : प्रति किलो १० ते १५ रुपयांची दरवाढ निपाणी (वार्ता) : इस्त्राईल -अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरावर होत आहे. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या असून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी आठवडाभरात खाद्यतेलाच्या …
Read More »अंतर्गत आरक्षणासाठी दलित संघर्ष समितीचे आंदोलन
बेळगाव : अंतर्गत आरक्षणाशिवाय नोकरभरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीने बुधवारी बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी निर्माण करून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. नोकरी इच्छुकांच्या दबावामुळे ५६ हजार ४३२ पदांच्या भरतीचा जो निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, त्याला …
Read More »ई-मालमत्ता पत्रासाठी बेळगावमधील उद्योजक आक्रमक
बेळगाव : ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेचे उंबरठे झिजवणाऱ्या आणि प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संतापलेल्या बेळगावमधील उद्योजकांनी आज अशोकनगर येथील महानगरपालिका कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. हुबळी-धारवाडपेक्षा बेळगाव महानगरपालिकेचे नियम वेगळे असून ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी जादा पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊनही अधिकारी कार्यालयात …
Read More »उद्या होणाऱ्या रामनवमी निमित्त मंदिरे सज्ज
बेळगाव : उद्या गुरुवारी चैत्र शुद्ध नवमी श्री रामनवमी निमित्त बेळगाव शहर, अपनगर तसेच ग्रामीण भागातील लहान मोठ्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून आज बुधवारी सर्व मंदिर सुसज्ज करण्यात आली आहेत. श्रीराम नवमी उत्सवानिमित्त गेले दोन-तीन दिवस विविध श्री राम मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे …
Read More »लवकरच तज्ञ कमिटी व उच्चाधिकार समितीची बैठक बोलवू; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, नेते श्री. जयंतराव पाटील यांचो भेट घेऊन त्यांच्याशी सीमा प्रश्नासंदर्भात व मराठी जनतेच्या अडचणी संदर्भात चर्चा केली होती. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांची एक प्रत मला द्या अशी विनंती केली होती. रविवारी या पत्राची प्रत मध्यवर्ती …
Read More »महामेळाव्याच्या दोन खटल्यात सुनावणी 27 मार्च रोजी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर दाखल केलेल्या दोन खटल्यांची सुनावणी शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी बेळगाव न्यायालयात होणार आहे, या दोन्ही खटल्यातील कार्यकर्ते व नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामेळावा खटला क्रमांक 61/2020 दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलेल्या खटला क्रमांक 61/2020 मध्ये मनोहर …
Read More »कपिलेश्वर मंदिराच्यावतीने जोतिबा डोंगराकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांना देण्यात आल्या शिधास्वरूपात वस्तू तर बैल जोड्यांना सकस आहार
बेळगाव : चैत्र पौर्णिमेसाठी बैलगाड्या व सासन काठी घेऊन बेळगावहून जोतिबा डोंगराला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने शिधास्वरूपात वस्तू देण्यात आल्या तसेच बैल गाड्यांना जुंपलेल्या बैलांसाठी पौष्टिक खाद्य देण्यात आले. इतकेच नाही तर पहिल्या मुक्कामी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चैत्र पौर्णिमेसाठी प्रतिवर्षी चव्हाट गल्ली, बेळगाव येथून …
Read More »सिलेंडरचा तुटवडा अन् लाकडाला गर्दी
नागरिकांची वखारीकडे धाव; उपनगरांसह ग्रामीण भागात पेटल्या चुली निपाणी (वार्ता) : इस्त्राईल-अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युध्दाचे परिणाम देशातील गॅस वितरण व्यवस्थेवर झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हॉटेल मालकांनी लाकडाचा पर्याय निवडला आहे. घरगुती सिलिंडरचा जास्त दिवस पुरवठा होण्यासाठी सर्वसामान्यांनीही आपला मोर्चा लाकडाकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta