Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

इनामदार साखर कारखाना दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाईचा एसपींचा इशारा

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात झालेल्या बॉयलर दुर्घटनेप्रकरणी कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, याचा तांत्रिक अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणातील तपासाची दिशा स्पष्ट केली. पोलीस अधीक्षक रामराजन …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी रोजी हुतात्मादिन पाळण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तरी म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी वेळेत उपस्थित …

Read More »

‘मच्छे श्री फीट प्रो क्लासिक’ किताबाचा व्यंकटेश तहशिलदार मानकरी

  बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे आयोजित मच्छे श्री फीट प्रो क्लासिक -2026 या बेळगाव जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील विजेतेपदाचा ‘मच्छे श्री फीट प्रो क्लासिक’ किताब पॉलिहाइड्रोन जिमच्या व्यंकटेश तहशिलदार याने हस्तगत केला. तसेच फिट प्रो टॉप -10 या व्यायामशाळा (जिम) पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचा विजेता फिट …

Read More »

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ उदय आणि अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राधानगरीतील जंगलात दोघांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आणि त्याची प्रेयसी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांनी …

Read More »

पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी प्रकरणांची मालिका सुरू आहे. एका पतीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतःलाही गळफास लावला. सदर घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, यल्लव्वा नामक महिलेच्या आईचे निधन होऊन एक आठवडा झाला होता. ती धार्मिक विधी …

Read More »

41 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रंगणार उद्या

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मराठी साहित्य संघातर्फे राज्य मराठी विकास संस्था मुंबई व सांगाती साहित्य अकादमी बेळगाव यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 11 जानेवारी 2026 रोजी 41 वे कडोली मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कडोली येथे गेल्या चार दशकांपासून आयोजित केले जाणारे हे …

Read More »

कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्काराचे मंगळवारी वितरण

  बेळगांव : ज्येष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) बेळगांव येथे होणार आहे. कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारा यंदाचा पहिला पुरस्कार कामगार ‌क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अखिल भारतीय आयटक कामगार संघटनेच्या महासचिव …

Read More »

प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे “न समजलेले आईबाप” यावर उद्या व्याख्यान

  बेळगाव : बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयाच्या प्रांगणात उद्या शनिवार दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे “न समजलेले आईबाप” या विषयावर श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव यांच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अधिक वावरत …

Read More »

हुबळी येथील “त्या” निंदनीय घटनेचा बेळगाव भाजपकडून निषेध

  बेळगाव : 7 जानेवारी रोजी पोलिसांनी हुबळी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या सुजाता हंडी यांना विवस्त्र केल्याची निंदनीय घटना हुबळी येथे घडली. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्ष आणि भाजप महिला मोर्चातर्फे आज भव्य मोर्चा काढून पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. या …

Read More »

रयत संघटनेतर्फे रविवारी भिवशी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे भिवशी (ता.निपाणी) येथे शेतकरी मेळावा आणि संघटनेच्या शाखेचे उद्घाटन रविवारी (ता.११) सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. भिवशी येथील हालसिद्धनाथ दूध डेअरी समोर आयोजित मेळाव्यात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार हे शेतकऱ्यांना विविध समस्या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय संघटनेचे …

Read More »