Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर हिमस्खलन; ७ जणांचा मृत्यू

  श्रीनगर : श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गावर लडाखमधील झोजी ला या खिंडीजवळ एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अचानक मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं असून अनेक वाहने यामध्ये बर्फाखाली गाडली गेली आहेत. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर हा …

Read More »

अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

  मुंबई : अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचे …

Read More »

मराठा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात कृतिशील समितीने घेतली जॉईंट रजिस्ट्रारची भेट

  बेळगाव : बेळगाव मधील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी या मागणीसाठी कृतिशील मराठा समाजाच्या समितीच्यावतीने आज सहकारी संस्थेचे जॉईंट रजिस्ट्रार अधिकाऱ्याची भेट घेऊन मागणी करण्यात आली. यासंदर्भात बोलताना कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई म्हणाले की, मराठा बँकेत 22 उमेदवारांची नोकर भरती …

Read More »

ओबीसी ‘क्रीमी लेयर’ उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा विचार

  आठ लाखांवरून १२.७५ लाखांपर्यंत प्रस्ताव बंगळूर : राज्य सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातील ‘क्रीमी लेयर’साठी असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांवरून सुमारे १२.७५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिमोगा मतदारसंघाचे आमदार एस. एन. चन्नबसप्पा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना …

Read More »

हिंदीसह तृतीय भाषेला गुण नाहीत, फक्त ग्रेड

  दहावी परीक्षेत मोठा बदल; एकूण गुण ६२५ वरून ५२५ बंगळूर : राज्य सरकारने दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षापद्धतीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला असून, तृतीय भाषेच्या (हिंदी किंवा इतर भाषा) गुणांना आता एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. याऐवजी त्या विषयासाठी केवळ ‘श्रेणी’ (ग्रेड) देण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री …

Read More »

इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : आ. राजेश क्षीरसागर

  कोल्हापूर (जिमाका) : इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे. तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल, गॅस) आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे …

Read More »

राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

  कोल्हापूर (जिमाका) : ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्यायाचे प्रमाण कमी असले, तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने सोबत कंबर कसावी,’ असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अनुसूचित …

Read More »

पहिलीत प्रवेशासाठी वयोमर्यादेत सवलत; २०२६-२७ साठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    बंगळूर : सहा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलांच्या पालकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक या नियमात २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी सवलत देण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी विधानसभेत घोषणा केली. मंत्र्यांनी सांगितले की, पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे …

Read More »

महावीर जयंतीमुळे दहावी परीक्षा वेळापत्रकात बदल; तृतीय भाषा विषय पेपर ३० ऐवजी ३१ मार्च रोजी

  बेंगळूर : राज्यात सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात महावीर जयंतीनिमित्त बदल करण्यात आला आहे. ३० मार्च रोजी होणारे तृतीय भाषा विषयांचे पेपर आता ३१ मार्च रोजी घेण्यात येणार आहेत. तृतीय भाषा अंतर्गत इंग्रजी, कन्नड, हिंदी, उर्दू, अरबी, संस्कृत, कोकणी, मराठी आणि तुळू या विषयांचा समावेश आहे. कर्नाटक शालेय शिक्षण …

Read More »

निपाणीतील श्रीराम नवमी उत्सवाची पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमाने सांगता

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या नऊ दिवसापासून रामनवमी सोहळ्यानिमित्त विविध येथील बेळगाव नाक्यावरील श्रीराम मंदिरासह इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहर आणि उपनगरात चैतन्याचे वातावरण पसरले होते. या रामनवमी उत्सवाची पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता.२७) सांगता करण्यात आली. सांगता सोहळा निमित्त येथील श्रीराम मंदिरात सकाळी …

Read More »