Monday , September 21 2026
Breaking News

दिवसाढवळ्या घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद; 23 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

Spread the love

बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडीच्या मालिकेमागील सराईत चोरट्याला अटक करून तब्बल 23 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दि. 10 मे 2026 रोजी शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम नगर येथे कुलूप लावलेल्या घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्याने 42 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घरफोडीच्या वाढत्या घटनांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले होते. दि. 25 मे रोजी शिंदोळी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एका संशयित इसमाची हालचाल संशयास्पद वाटली. चौकशीदरम्यान तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी अधिक कसून तपास केला असता त्याने घरफोडीची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विश्वनाथ दुर्गप्पा मुत्तूर (वय 26, रा. बेविनमट्टी, जि. बागलकोट) असे असून तो मजुरीचे काम करत होता. तपासादरम्यान आरोपी हा मारिहाळ पोलीस ठाण्यातील तीन तसेच काकती पोलीस ठाण्यातील एका घरफोडी प्रकरणात सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 134 ग्रॅम सोन्याचे दागिने व 510 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या यशस्वी मोहिमेबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *