Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या बस स्थानकाच्या भिंती

  दंडात्मक कारवाईची मागणी ; निपाणीतील प्रवाशांना दुर्गंधीचा सामना निपाणी (वार्ता) : प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या येथील बसस्थानक परिसरात जिकडे-तिकडे गुटखा आणि तंबाखू खाऊन थुंकल्याचे दिसून येत आहे. या बस स्थानकाच्या भिंती तंबाखूयुक्त गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. येथे येणाऱ्या महिला विद्यार्थिनी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी निपाणी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर आणि इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल तसेच डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. …

Read More »

बेकायदेशीर शस्त्रांसह मार्केट पोलिसांकडून तिघांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मार्केट पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींची तपासणी करताना शस्त्रे बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक केली आहे. तसेच एका अन्य कारवाईत मटका जुगार खेळणाऱ्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर आणि त्यांचे पथक सोमवारी महाद्वार रोडवरील ओव्हर ब्रिजखाली तपासणी …

Read More »

भोंदू अशोक खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी ‘अघोरी’ विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

  नाशिक : नाशिकचा भामटा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याचे कुख्यात कारनामे एकामागून एक समोर येत आहे. अनेक महिला त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत. त्यांचे 300 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहे. शोषणाच्या या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकारण्यांसोबत मिळून त्याने क्राइम सिंडिकेट चालवल्याचे हळूहळू …

Read More »

रयत गल्लीतील विहिरीचे पाणी अजूनही दुषितच; मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष

  बेळगाव : रयत गल्लीत “एलअँडटी” पाणी पुरवठा करणारे 8/10 दिवसांनी एकदा नळाला पाणी सोडतात. तेही एकदम कमी दाबाने. रोज सोडलं जातं ते गल्लीतील ज्येष्ठांनी 1936 साली काढलेल्या विहिरोचे पाणी फिल्टरद्वारे सोडलं जात. गेल्या महिन्याभरापूर्वी विहिरीच्या पाण्यात ड्रेनेजमिश्रित, दुर्गंधीयुक्त पाणी मिसळत असल्याने ते अत्यंत धोकादायक होते म्हणून बंद केले होते. …

Read More »

पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी लोकांची गर्दी

  बेळगाव : मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि वायूच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. याचा साहजिकच लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबल्याने लोक आधीच चिंतेत होते. आता तेलाचा पुरवठाही थांबणार असल्याच्या अफवा पसरल्याने, सोमवारी रात्री बेळगाव शहरातील बहुतेक पेट्रोल पंपांवर लोकांनी गर्दी केली. ते पेट्रोल आणि डिझेल …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास अन्न व्यवस्था धोक्यात

  रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार; निपाणीतील बैठकीत सरकारला इशारा निपाणी (वार्ता) : गॅस व इंधनाची टंचाई भासल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पण भविष्यात अन्नदाता शेतकरीच संपावर गेला तर भयंकर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सर्वत्र आहाकार माजेल, असा इशारा कर्नाटक …

Read More »

मृत्यु पूर्व जबानीतील तफावतीमुळे खून प्रकरणातील पाच जण निर्दोष

  बेळगाव : येथील सहावे जिल्हा व सत्र न्यायालयाने खून प्रकरणातील पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश ओ. शिवपुत्र दिंडलकोप यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देताना पुराव्यांतील व विशेषतः मृत्यु पूर्व जबानीतील तफावतीचा आधार घेत निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी जी. मंजु बाळराव देसाई (प्रभुनगर, खानापूर), अमोल परशराम परती, सुरज …

Read More »

जय जनकल्याण सौहार्दतर्फे मण्णूरमध्ये ‘शवरथ वाहन’ लोकार्पण

  बेळगाव : मण्णूर (ता जि. बेळगाव) येथील जय जनकल्याण सौहार्द संघातर्फे सामाजिक बांधिलकीतून मण्णूर गावांसाठी ‘शवरथ वाहन’ (शववाहिका) प्रदान कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. मण्णूर गावची स्मशानभूमी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. याखेरीज आजकाल अंत्यसंस्कारासाठी बहुतांशजण आपल्या वाहनांनी स्मशानभूमी पोहोचणे पसंत करतात. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांसह तिगडीवरून प्रेत नेताना …

Read More »

जूनपासून १० हजार अंगणवाडी केंद्रात एलकेजी-यूकेजी वर्ग

  मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; कार्यकर्त्यांच्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने तोडगा बंगळूर : राज्यातील दहा हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये येत्या जून महिन्यापासून एलकेजी व यूकेजी वर्ग सुरू करण्यात येणार असून, अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या विविध मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने …

Read More »