Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

शहापूर येथे पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने लाखोंचे नुकसान…

  बेळगाव : कालच्या मुसळधार उपनगरे जलमय झाली होती. शहापूर येथील एका टेलरिंग दुकानात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. शहापूर-गणेशपुर गल्ली येथील शिल्पा मगावी यांच्या मालकीच्या टेलरिंग दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने टेलरिंग दुकानातील साहित्य, महागड्या सिल्क साड्या आणि लग्नाचे कपडे खराब झाले. यामुळे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान …

Read More »

आमचा गट भाजपातच राहील : आम. रमेश जारकीहोळी

  बेळगाव : आमचा गट भाजपमध्येच कायम राहील, यत्नाळ यांनी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा इशारा दिला असला तरी यात तथ्य नसून आम्ही सर्वजण भाजपमध्येच कार्यरत राहू असा विश्वास गोकाकचे आमदार, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी …

Read More »

संकेश्वरात उत्साहात स्वामी समर्थ प्रकटदिन!

  संकेश्वर : संकेश्वर येथील दत्त पंत मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन दूरदुंडेश्वर भवनात साजरा झाला. सकाळी स्वामींच्या प्रतिमेचे पूजन व भूपाळी झाली. दरम्यान सारामृत पारायणाची पोथी २०० हून अधिक सेविकाऱ्यांनी वाचन केले. यावेळी नारायण फलसे, संतोष मगदूम यांच्याहस्ते महाआरती झाली. शंकराचार्य मठाचे सच्चिदानंद अभिनव …

Read More »

शहापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा लवकरच जिर्णोध्दार

  मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : शहापूर बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिर येथे शहापूर परिसरातील विविध गल्ल्यातील पंचमंडळी महिला युवक ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात …

Read More »

मणतुर्गे (ता. खानापूर) येथील श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन…

  खानापूर : मणतुर्गे (ता. खानापूर) येथे गुढीपाडव्या निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले. नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. …

Read More »

दूध, दही, वीज दरात आजपासून वाढ

  बंगळूर : राज्यातील जनतेला आज (ता.१) पासून दरवाढीचा फटका बसणार आहे. नंदिनीचे दूध, दही आणि वीजेचे दर आणखी महाग होतील. बस आणि मेट्रोचे भाडे आधीच जास्त असल्याने,आजपासून ग्राहकांच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे. ऊर्जा विभागाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीमध्ये प्रति युनिट ३६ पैशांची वाढ केली आहे. दुसरीकडे, सरकारने नंदिनी …

Read More »

….अन् न्यामती बॅंक दरोड्यातील सोने सापडले तमिळनाडूतील विहिरीत

  सोन्याचे दागिने पाहून पोलिसही झाले थक्क बंगळूर : तामिळनाडूतील मदुराई येथील एका विहिरीत शेकडो चेन, नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्या, ताली चेन आणि ब्रेसलेटसह एकूण १७ किलो सोने सापडले आहे. विशेष म्हणजे हे सर्व सोन्याचे दागिने दावणगेरे येथील न्यामती बँक दरोडा प्रकरणातील असल्याचे समजते. तामिळनाडूतील एका विहिरीत सापडलेले १७ किलो सोने …

Read More »

कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात सिंहिणीचे आगमन

  बेळगाव : बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून बेळगावच्या कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात एका सिंहिणीला आणण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी रोजी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात निरुपमा नावाच्या सिंहिणीचा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे कृष्ण नावाचा सिंह एकाकी पडला. काल रविवारी बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून या सिंहिणीला भुतरामनहट्टीची येथील  प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बुधवारी बैठक

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किनेकर माजी आमदार यांनी केले आहे.

Read More »

ज्योतिर्लिंग देवस्थान बेळगाव येथे 3 एप्रिल रोजी कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी जोतिबा देवाचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जोतिबाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. तसेच केदार ग्रंथाचे पठण करण्यात येणार असून बारा वाजता आरती करून तीर्थप्रसाद वाटप होणार आहे.त्यानंतर जोतिबा देवाचा जप करण्यात येणार …

Read More »