Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

गडहिंग्लजमध्ये ५ एप्रिलला युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलन

  गडहिंग्लज : पहिले युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलन गडहिंग्लज येथे घेण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक होते. यापूर्वी जनवादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने सावंतवाडी येथे २०२२ साली पहिले जनवादी साहित्य संमेलन झाले होते तर दुसरे संमेलन कोल्हापूर येथे गतवर्षी पार पडले होते. …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाचा 23 रोजी वधूवर मेळावा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.23 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. येथील ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (मराठा मंदिराच्या पुढे) येथील सभागृहात सकाळी 10.30 वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे निरोप समारंभ व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

    बेळगाव : श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे एस.एस.एल.सी. व सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न तसेच राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला संस्थेचे दिवंगत सचिव के. बी. निलजकर सर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजुकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. सकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रीय …

Read More »

शेतकरी व ग्राहकांवर भार न टाकता दुधाचे दर वाढवणार : मंत्री व्यंकटेश

  बंगळूर : शेतकरी आणि ग्राहकांसाठी सोयीस्कर पद्धतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून दुधाच्या किमतीत वाढ करण्यासाठी शक्य तितक्या लवकर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री व्यंकटेश यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य उमाश्री आणि एम. जी. मुळे यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. शेतकऱ्यांकडून दुधाच्या किमतीत वाढ करण्याची …

Read More »

अभिनेत्री रन्याच्या फ्लॅटवरील छाप्यात कोट्यवधीची रोकड, सोने जप्त

    तस्करीच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री पोलिस महासंचालकांची मुलगी बंगळूर : दुबईतून बेकायदेशीरपणे सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रन्या रावच्या बंगळुर येथील निवासस्थानी बुधवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छापा टाकला आणि कोट्यवधी रुपयांची मोठी रोकड आणि सोने जप्त केले. सोमवारी रात्री दुबईहून एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाने केम्पेगौडा …

Read More »

“त्या” दोघांच्या मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

  बेळगाव : प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा चाकूने गळा चिरून खून केल्यानंतर प्रियकरानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी संध्याकाळी शहापूर नाथ पै सर्कल जवळ घडली होती.या प्रेम प्रकरणात ऐश्वर्या लोहार (रा.नवी गल्ली) आणि प्रशांत कुंडेकर (रा.येळ्ळूर) या दोघांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे शहापूर परिसरात एकच खळबळ उडाली. त्याचबरोबर …

Read More »

आई-वडील हे आपले पहिले गुरू : वाय. पी. नाईक

  चिरमुरी : घर हे आपलं पहिलं संस्काराचे केंद्र आहे. शाळा हे ज्ञान मंदिर. पहिला मान आईवडील यांचा आहे शिक्षक हे आपणास पुस्तकी ज्ञान देऊन समृद्ध करतात तर आईवडील अनुभव शिकवतात. दोघाचंही स्थान तेवढंच महत्त्वाचं आहे सत्य हे जीवनात आत्मविश्वास निर्माण करतं. प्रामाणिकपणा आयुष्यात उभारी देत. छंद जोपासा, खेळ खेळा …

Read More »

पीडीओचा रस्ता अपघातात मृत्यू

  अथणी : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात ग्रामपंचायत पीडीओचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता अनंतपूर गावातून तांवशी मार्गावर जात असताना झालेल्या अपघातात नागनूर पा. गावातील अशोक सनदी (48) यांचा मृत्यू झाला. गेल्या 20 वर्षांपासून ते विविध ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत होते आणि आजारपणामुळे गेल्या 6 महिन्यांपासून …

Read More »

बीम्स हॉस्पिटलला लोकायुक्तांची अचानक भेट

  बेळगाव : बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला आज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान बीम्समधील समस्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था आणि सरकारच्या निर्देशानुसार इतर समस्यांची पाहणी केली. यावेळी लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली २० हून अधिक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्या दालनात …

Read More »

महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या आरोपीला अटक

  बेळगाव : एकट्या महिलेच्या घरात घुसून तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दरोडेखोराला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २७ जानेवारी रोजी राणी चन्नम्मा नगर, बेळगाव येथील दुसऱ्या चौकात एका दरोडेखोराने एका महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ३ लाख ५० हजार किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. …

Read More »