बेळगाव : २६ जानेवारी रोजी खाजगी बसने प्रयागराज कुंभमेळ्याला गेलेले बेळगाव येथील यात्रेकरू सुखरूप घरी परतले आहेत. बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे दोन्ही खासगी बसने आलेले भाविक दु:खात घरी परतले. एका भाविकाने सांगितले की, २६ तारखेला आम्ही बेळगावहून प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी गेलो. तिथे आमची खूप अडचण झाली. …
Read More »बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांची कै. श्री. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस सदिच्छा भेट!
बेळगाव : सीमा भागातील वंचित मराठी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतूने पदरमोड करून गेली नऊ वर्षे चालविलेल्या या व्याख्यानमालेचा अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून इयत्ता दहावीच्या परिक्षेत केवळ टक्केवारी मिळविणे हा या व्याख्यानमालेचा हेतू नसून जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे व आत्मनिर्भर …
Read More »जीएसएसचे प्राचार्य अरविंद हलगेकर सेवानिवृत्त तर नविन प्राचार्य म्हणून प्रा. अभय सामंत यांची निवड
बेळगाव : जीएसएस कॉलेजचे प्राचार्य श्री. अरविंद हलगेकर हे प्राध्यापक, जीवशास्त्राचे समन्वयक, एन. सी. सी. अधिकारी असे अनेक पदावर कार्य करून 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना निरोप देताना एस के इ. चे पदाधिकारी, दक्षिण म. शि. मंडळ या संस्थेचे श्री. विक्रम पाटील, …
Read More »नाशिक-गुजरात हायवेवर खाजगी बस 200 फूट खोल दरीत कोसळली; 7 जण ठार
नाशिक-गुजरात हायवेवर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात हा अपघात झाला. एका खाजगी लक्झरी प्रवासी बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले, तर 15 प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी त्यांना नजीकच्या रुग्णालयात …
Read More »शेतकरी, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : डॉ. सरनोबत
बेळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला देशाचा अर्थसंकल्प अतिशय उत्तम असून शेतकरी, महिला, सामान्य माणूस आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सचिव व सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी …
Read More »जिल्हा रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू…
बेळगाव : जिल्हा रुग्णालयात बाळंतिणींच्या मृत्यूचे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आज आणखी एका बाळंतिणीला मृत्यूने कवटाळले. बेळगाव तालुक्यातील करडीगुद्दी गावातील गंगव्वा (३१) नावाच्या महिलेचा बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ३१ जानेवारी रोजी तिचे सिझेरियन झाले. त्यावेळी तिची प्रकृती व्यवस्थित होती. मात्र आज दुपारनंतर तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी …
Read More »बेळगांवहून निघालेला डिझेल टँकर कॅसलरॉकजवळ पलटी
रामनगर : जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक येथे कलंबली क्रॉसजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे टँकरमधील डिझेल रस्त्यावर पूर्णपणे गळून धोका निर्माण झाला आहे. देसुरहून कॅसलरॉककडे निघालेल्या टँकरचा हा अपघात घडला. टँकर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस आणि …
Read More »दागिने चोरांना अटक, ९.६० लाखांचे दागिने जप्त
मुडलगी : घरफोडी प्रकरणी कुलघोड पोलिसांनी दोघांना अटक करून एक ऑटो रिक्षा व ९.६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. राघवेंद्र रामू रेवणकर (22) आणि ओंकार दयानंद जाधव (21, रा. गोकाक नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गोकाका तालुक्यातील कौजलगी गावात एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद …
Read More »नक्षलवादी कोटेहोंडा रवीने केले आत्मसमर्पण
विक्रम गौडा चकमकीत झाला होता बेपत्ता बंगळूर : नक्षल चळवळीत सक्रिय असलेला कोटेहोंड रवी उर्फ रवींद्र नेम्मार याने चिक्कमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या आयबी येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यासह राज्यातील नक्षलवाद्यांचे युग संपुष्टात आले आहे. नुकत्याच आत्मसमर्पण केलेल्या सहा नक्षलवाद्यांच्या गटाचा भाग असलेला रवी …
Read More »बी. आर. पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागारपदाचा राजीनामा
बंगळूर : आमदार बी. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. पाटील यांच्या अचानक राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून कार्यरत असलेले आळंद मतदारसंघाचे आमदार बी. आर. पाटील यांनी आज आपल्या सल्लागार पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द केला. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या बी.आर.पाटील यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta