मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असे शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज्यात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी म्हटले की, सगळ्याची विचारधारा एक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी निवडणूक लढणार नाही त्यामुळे मी या प्रक्रियेत नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.
काही आमदारांचा कल अजित पवारांकडे…
काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबतचा निर्णय हा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी घ्यावा असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी खासदारांसोबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.