Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) याने अल्पवयीन मुलीला (बालिकेला) प्रेमाचे आमिष दाखवून दुचाकीवरून अपहरण करून अत्याचार (बलात्कार) केल्याचे प्रकरण संकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवशरण अवजी यांनी आरोपी दर्शन हुणश्याळी याला गजाआड करुन पोक्सो कायद्याअंतर्गत …

Read More »

सिगारेटच्या पैशांवरून बोडकेहट्टी येथील दुकानदाराची निर्घृण हत्या

  बेळगाव : दारूची नशा आणि एका क्षुल्लक वादाचे पर्यावसान दुकानदाराच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगाव तालुक्यातील बोडकेहट्टी येथे सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून चार तरुणांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून त्यांचा बळी घेतला. बोडकेहट्टी येथील रहिवासी यल्लाप्पा दुर्गप्पा नाईक (४८) असे या दुर्दैवी दुकानदाराचे नाव आहे. मंगळवारी …

Read More »

अळवाण गल्ली सरकारी उर्दू शाळेचा 7 रोजी हीरक महोत्सव

  बेळगाव : अळवाण गल्ली, शहापूर बेळगाव येथील सरकारी उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र. 6 या शाळेचा हीरक महोत्सव सोहळा येत्या शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर हीरक महोत्सवी सोहळा अळवन गल्ली, शहापूर येथील पंडित नेहरू कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. सोहळ्याच्या उद्घाटन …

Read More »

हिंडलगा येथे हिंदुराष्ट्र सेना-श्रीराम सेनेतर्फे हळदीकुंकू व धर्मसभेचे भव्य आयोजन

  बेळगाव : बेळगावजवळील हिंडलगा येथे कट्टर हिंदुत्ववादी हिंदुराष्ट्र सेना आणि श्रीराम सेना कर्नाटक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हळदी-कुंकू आणि भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकुमार कोकीतकर आणि भाग्यश्री कोकीतकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्याला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवत हिंदू संस्कृतीचा जागर केला. २८ जानेवारी रोजी झालेल्या …

Read More »

हारुगेरी येथे भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

  बेळगाव : रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून गजानन वडेयार (२२), महादेव गोलबावी (२२) आणि मलाप्पा गोलबावी (२६) यांचा मृत्यू अशी मृतांची नावे आहेत. हारुगेरी येथील रहमान धाब्याजवळ मुगलाखोडाकडे दुचाकीवरून तिघेजण जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि …

Read More »

ग्रामदैवत महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्त निपाणीत शुक्रवारपासून दळप, कांडप गिरण्या बंद

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची रविवारची यात्रा आणि नूतन मंदिराचा वास्तुशांती सोहळ्याला मंगळवारपासून (ता.३) सुरूवात झाली आहे. ही यात्रा बुधवारपर्यंत (ता. ११) साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात शहर आणि उपनगरातील दळप, कांडप गिरण्या बंद राहणार आहेत. या काळात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन निपाणी शहर …

Read More »

निपाणीतील शेट्टी सराफांनी बनविली गुलबर्ग्यातील अनवीर भद्रेश्वर देवाची २० किलोची चांदीची पालखी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अशोक नगरातील अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी यांच्या सराफ दुकानात गुलबर्गा जिल्ह्यातील अनवीर भद्रेश्वर देवालयातील २० किलो ४१० वजनाची पालखी बनविण्यात आली आहे. त्यासाठी १५ कारागीरांनी तीन महिने परिश्रम घेतले आहेत. ही पालखी आकर्षक झाल्याची माहिती देवस्थानचे पृथ्वीराज पाटील, सिद्धलिंग क्षेमशेट्टी यांनी सांगितले. चांदीची पालखी बनवण्यासाठी …

Read More »

लोकविश्वासास पात्र ठरलेली नवहिंद सोसायटी : महापौर मंगेश पवार

  बेळगाव : नवहिंद को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.येळ्ळूर (आंतरराज्य) ता. जि. बेळगाव या संस्थेने चांगला व्यवसाय केलेला असून गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवून लोकविश्वासास पात्र ठरलेली आहे, असे गौरवोदगार महापौर मंगेश पवार यांनी नवहिंद सोसायटीच्या गणेशपूर शाखेच्या स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी काढले. प्राचार्य श्री. बी. बी. देसाई यांनी सहकार हा …

Read More »

बोरगांव प्राथमिक ग्रामीण कृषी संघातर्फे मयत सभासदांच्या वारसांना लाखाची मदत

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथीलविविधोद्देशिय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाचे सभासद शिवानंद बाबू माळी यांचे नुकत्याच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदार मातोश्री आक्काताई बाबू माळी यांना विमा कंपनीकडून १ लाखाचा मदतीने मंजूर झाला होता. रक्कमेच्या धनादेशाचे वितरण अरिहंत सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात …

Read More »

कपिलेश्वर मंदिरातर्फे रक्तदान शिबीर, अधिकृत वेबसाईटचे उदघाट्न

  बेळगाव : श्री दक्षिण काशी कपिलेश्‍वर मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मंदिराच्या सभागृहात सोमवारी (ता.२) हे शिबिर झाले. यावेळी एकूण ७५ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यानंतर सायंकाळी मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी मंदिराचे अध्यक्ष राहूल कुरणे यांच्या हस्ते पुजा करून रक्तदान शिबिराला …

Read More »