Thursday , March 5 2026
Breaking News

Belgaum Varta

हिटमॅन रोहित शर्माची अचानक कसोटीमधून निवृत्ती

  मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने अचानक कसोटीमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती सर्वांना दिली. भारतीय संघ आयपीएलनंतर पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीच रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करत मोठा धक्का दिला. हिटमॅन …

Read More »

कांद्याचे दर गडगडले : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

  बेळगाव : काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार होत होती, मात्र आता त्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा विक्रीसाठी एपीएमसीत आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दर इतका घसरला आहे की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून येत नाही. बेळगावसह महाराष्ट्रातील कांदा थेट बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये येतो आहे. …

Read More »

नागपूर येथील दीक्षांत समारंभात; डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांना पदवी बहाल

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील डॉ. निखिल संजय पंतबाळेकुंद्री यांनी प्रथम क्रमांक पटकावून ७ सुवर्णपदके मिळवत एम‌. डी. (डॉक्टर ऑफ मेडिसिन) पदवी पूर्ण केली. त्यानंतर वर्धा-नागपूर येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जेएनएमसी) येथे झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले. पदव्युत्तर दिक्षांत समारंभात एएफएमसीच्या व्हाइस एडमिरल डॉ. …

Read More »

निपाणीत १४ पासून खासदार चषक टॉप स्टार प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबतर्फे बुधवारपासून (ता. १४) २ लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे असणाऱ्या ‘खासदार चषक’ टॉप स्टार प्रीमियम लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण बुडा अध्यक्ष अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे व टॉप स्टार स्पोर्टस् क्लबच्या पदाधिकाऱ्यातर्फे करण्यात आले लक्ष्मण चिंगळे …

Read More »

मसूद अजहरचे आख्खे कुटुंब संपले, भाऊ, बहिणीसह 14 जणांना यमसदनी धाडले!

  नवी दिल्ली : 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्याने अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला आहे. अशातच या एअर स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद समोर येत असताना या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती मिळाली आली आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात देशाचा …

Read More »

बेकायदेशीर खाणकाम : माजी मंत्री आमदार जनार्दन रेड्डी यांना सात वर्षांची शिक्षा

  सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल बंगळूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ओबळापुरम मायनिंग कंपनी (ओएमसी) च्या बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने माजी मंत्री आणि गंगावतीचे विद्यमान आमदार गाली जनार्दन रेड्डी यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ओएमसी बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात युक्तिवाद ऐकणाऱ्या हैदराबाद सीबीआय न्यायालयाने आजसाठी निकाल राखून …

Read More »

कारवार, बंगळुर, रायचूर येथे आज दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल युद्धाचा सायरन वाजणार

  बंगळूर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध युद्धाची तयारी करत असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने कर्नाटकसह अनेक राज्यांना उद्या (ता. ७) मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात, उद्या बंगळुर, कारवार आणि रायचूर येथे मॉक परेड आयोजित केल्या जातील. याबद्दल माहिती देताना डीजेपी प्रशांत कुमार ठाकूर …

Read More »

पाकिस्तानकडून एलओसीवर फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू

  नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले असून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्तानला मोठी धडकी भरली आहे. पाकिस्तानने देखील एलओसीवर फायरिंग केली. ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मोर्टार शेलिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ …

Read More »

ऑपरेशन सिंदूर फत्ते : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त!

  नवी दिल्ली : भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारतीय वायुदलाने आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. …

Read More »

मोदी सरकार पाकिस्तानला देईल योग्य उत्तर : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : पाकिस्तानविरोधी कारवाईबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असे वक्तव्य बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज केले. केंद्राच्या आदेशानुसार राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांच्या देशात परत पाठवावे, असे निर्देश त्यांनी राज्य सरकारला दिले. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, …

Read More »