उच्च न्यायालयाने ईडीच्या समन्सला दिली स्थगिती बंगळूर : उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि मंत्री भैरती सुरेश यांना म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटपाशी संबंधित सुनावणीत हजर राहण्यासाठी बजावलेल्या नोटीसला स्थगिती दिली. ईडीची नोटीस जारी होताच, पार्वती सिद्धरामय्या आणि …
Read More »महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याचे दागिने लांबविले
राणी चन्नम्मा नगर परिसरातील घटना बेळगाव : भरदिवसा महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना राणी चन्नम्मा नगर सेकंड स्टेज उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत सोमवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगन हे एलअँडटी कंपनीचे अधिकारी …
Read More »विद्याप्रसारक मंडळाची ५५ वर्षाच्या आनंदोत्सवाची जय्यत तयारी
बेळगाव (सौजन्य मिलिंद देसाई) : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम रोड येथील विद्या प्रसारक शिक्षण मंडळाचे 55 व्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. बहुजन समाजातील …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे विज्ञान प्रदर्शन
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सध्याच्या युग हे विज्ञान युग आहे, आणि अशा ह्या विज्ञान युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपली यशस्वी वाटचाल केली पाहिजे. अशा उदात्त हेतूने राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी विज्ञान …
Read More »बेळगावात आणखी एक बालक विक्री प्रकरण उघडकीस; तीन आरोपींना अटक
बेळगाव : अलीकडे मुलांच्या विक्रीचे प्रकरण खूप गाजत आहे. हुक्केरी तालुक्यातील सुलतानपूर येथील पाच वर्षांच्या मुलाची विक्री केल्याचा गुन्हा हुक्केरी पोलिसांनी उकरून काढला असून महाराष्ट्रातील तीन आरोपींना अटक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील मड्याळ येथील संगीता हमण्णावर, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील निवली येथील मोहन तावडे आणि त्यांची पत्नी …
Read More »खानापूर नगराध्यक्षपदी मीनाक्षी बैलूरकर व उपनगराध्यक्षपदी जया भुतकी यांची बिनविरोध निवड
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीत अर्ज भरण्याची वेळ, आज सोमवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 पर्यंत होती. परंतु नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी मीनाक्षी बैलूरकर व जया भूतकी यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दुपारी …
Read More »युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा माध्यमिक गट आणि महाविद्यालय गटाचा निकाल जाहीर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ चे माध्यमिक गट आणि महाविद्यालय गटाचा निकाल जाहीर करीत आहोत* माध्यमिक गटातील विजेते पहिला क्रमांक : वेदांत चंद्रकांत कुगजी (चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर) दुसरा क्रमांक : प्रसाद बसवंत मोळेराखी (मराठी विद्यानिकेतन बेळगाव) तिसरा क्रमांक : सई शिवाजी शिंदे (कुद्रेमणी …
Read More »‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजपासह सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (२७ जानेवारी) आम आदमी पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ गॅरंटी जाहीर केल्या …
Read More »मराठी भाषेला प्राधान्य द्या; प्रा. डॉ. गोपाळ पाटील
बेळगाव : विद्यार्थ्यांनी सोपी आहे म्हणून कॉलेजमध्ये हिंदी भाषा न घेता आपली मातृ भाषा मराठी घ्यावी कारण मराठी भाषा घेतल्याने एकदा गुण कमी मिळेल पण आपल्या भाषेचे ज्ञान सखोल वाढेल. मराठी भाषा घेतल्याचे खूप फायदे आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी मराठी विषय घ्यावा, असे विचार मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष व …
Read More »चिक्कोडी महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कित्तूरनजीक भरधाव कारची ट्रकला मागून धडक बसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चिकोडी येथील सहकार निबंधक कार्यालयातील व्दितीय दर्जा अधिकारी अमित नायकू शिंदे (वय 44 रा. अकोळ, ता. निपाणी) हे ठार झाले. तर कारमधील आणखीन तिघेजण जखमी झाले. अपघातातील जखमींवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta