Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

कित्तूरजवळील राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोन जागीच ठार

  कित्तूर : खानापूरहून कित्तूरमार्गे हुबळीकडे जात असताना दुचाकीस्वाराची राष्ट्रीय महामार्ग 48 वर झाडाला धडकून 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. संगोळ्ळी रायण्णा हुतात्मा दिनाचा एक भाग म्हणून खानापूर तालुक्यातील नंदगड गावात रायण्णा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळ दर्शनानंतर दोघेही तरुण जुन्या हुबळीकडे परत …

Read More »

वारंगलमध्ये रेल्वे ट्रॅकचे रॉड ट्रकमधून ऑटोवर पडले, ७ जणांचा मृत्यू, ६ जखमी

  वारंगल : तेलंगणातील वारंगलमधील वारंगल-मामुनुरु रोडवर भीषण अपघात झाला आहे. एका लॉरी आणि दोन ऑटोरिक्षांची टक्कर झाल्याने एका मुलासह सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांवर ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या एका लॉरीने दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोखंडी …

Read More »

मलप्रभा नदीत बुडालेल्या मन्नूरच्या युवकाचा मृतदेह सापडला!

खानापूर : मन्नूर बेळगाव येथील महिला व नागरिक, धार्मिक कार्य व पडली भरण्याच्या कार्यासाठी खानापूर येथील श्री मलप्रभा नदीला आले होते. यावेळी मन्नूर गावचा युवक समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय 22) बुडाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे कार्य अग्निशामक दल व खानापूर पोलीसांनी सुरू ठेवले होते. अग्निशामक दलाचे मनोहर राठोड तसेच …

Read More »

सैफ अली खान हल्लाप्रकरणी सर्वात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी चुकीच्या माणसाला पकडले

  मुंबई : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याच्या घरी सापडलेल्या फिंगरप्रिंट्स बांगलादेशी शरीफुल इस्लाम शहजादच्या फिंगरप्रिंटशी जुळत नाहीत, असा खळबळजनक खुलासा झाल्याचं बोललं जात आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुलला 16 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मिड-डेच्या वृत्तानुसार, सीआयडीनं तपास …

Read More »

मलप्रभा नदीत मन्नूरचा युवक बुडाल्याची घटना, शोधकार्य सुरू

  खानापूर : मलप्रभा नदी घाटाजवळ मन्नूर-बेळगाव येथील एक युवक धार्मिक कार्यासाठी व पडल्या भरण्यासाठी आला होता. यावेळी तो नदीत उतरला असता बुडाल्याची घटना घडली आहे. समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय अंदाजे 22 वर्षे) असे या बुडालेल्या युवकाचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि …

Read More »

बेळगुंदी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ संपन्न

  बेळगाव : बेळगुंदी येथील श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी व मुंबईतील महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित १९ वे साहित्य संमेलन २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. संमेलनाच्या शामियाना उभारणीचा मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. यावेळी निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. मरगाई देवस्थान परिसरात हा कार्यक्रम झाला. ग्रामस्थ कमिटी …

Read More »

उडुपीतील बालिकेच्या लैंगिक छळ प्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे त्वरित कारवाईचे निर्देश

  बेळगाव : उडुपी येथील एका अज्ञात व्यक्तीने 5 वर्षांच्या बालिकेचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश उडुपी जिल्हा पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहेत. अपघातात जखमी झालेल्या व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक व …

Read More »

बसवंत शहापुरकर यांच्या ‘कवितेचं गाव’ उलगडणारा कार्यक्रम सोमवारी

  बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळाची सोमवार दि. 27 जानेवारी 2025 रोजी संध्या. 5.30 वाजता शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथे श्रीमती अश्विनी ओगले यांच्या घरी बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी शब्दगंध कवी मंडळाचे जेष्ठ सदस्य कवी बसवंत शहापुरकर हे आपल्या ‘कवितेचं गाव’ या पहिल्या कविता संग्रहातील कवितांचे सादरीकरण करतील. …

Read More »

महादेव मंदिरात होणारी चोरी वाचवल्याने बाळू बाळेकनावर यांचा कमिटीतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात शुक्रवारी (ता.२४) मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील तिजोरी फोडली. त्यातील रक्कम पोत्यात भरून घेऊन जात असताना पोलीस कर्मचारी आणि बाळू बाळेकनावर यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरीपासून ही रक्कम वाचल्याने महादेव देवस्थान कमिटीतर्फे बाळेकनावर यांचा …

Read More »

शरद पवारांची प्रकृती खालावली, दौरे रद्द

  पुणे : मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र त्यांना नेमका काय त्रास होत आहे याबाबत …

Read More »