Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

मुर्डेश्वर येथे झालेल्या अपघातातील मुलींना वाचवण्यात जीएसएस कॉलेजच्या मुलांचे धाडस….

  बेळगाव : येथील जीएसएस कॉलेजच्या भूगर्भशास्त्राच्या विद्यार्थ्यांची स्टडी टूर गेली असता याचवेळी मुर्डेश्वर येथील समुद्रात कोलार येथील मोरारजी देसाई शाळेतील विद्यार्थी बुडताना बघून जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साहस करत समुद्रात धाव घेतली आणि बुडत असलेल्या तीन मुलींना वाचविण्यात त्यांना यश मिळाले आहे. या बद्दल मिळालेली माहीती अशी की, जीएसएस कॉलेजच्या …

Read More »

भारतीय सैन्यात नव्याने रुजू होणाऱ्या मराठा मंडळ ताराराणीच्या विद्यार्थिनींचा सत्कार!

  खानापूर : मराठा मंडळ संचलित पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला समस्त शिक्षकवृंदाला दिला असून भारतीय शेतकरी आणि जवान यांच्याप्रती आदर भावना कायम ठेवण्यास उपकृत केले आहे. म्हणूनच आज …

Read More »

अमित शहांच्या आंबेडकरांविषयीच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा संताप

  केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र; … तर शहा केंद्रीय मंत्री झालेच नसते बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांनी बी. आर. आंबेडकरांबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांना फटकारले आणि हा घटनेच्या मुख्य शिल्पकाराचा अपमान असल्याचे म्हटले. शाह यांनी संसदेत केलेले वक्तव्य हे आरएसएसच्या दीर्घकालीन विचारसरणीचाच विस्तार आहे, असे ते म्हणाले. …

Read More »

न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोचे थाटात उद्घाटन

  बेळगाव : वर्षअखेरीच्या खरेदीसाठी संपूर्ण देशाच्या विविध भागात उत्तम अशा वस्तूंचे प्रदर्शन यशस्वी केलेल्या न्यू इंडियन क्राफ्ट प्रदर्शनाची (एक्स्पोची) आता बेळगावात सुरुवात झाली आहे. सदाशिवनगर लक्ष्मी काँम्प्लेक्स नजीक सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी एक्स्पोचा शुभारंभ झाला असून बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या उपस्थितीत बुधवार दि. १८ डिसेंबर …

Read More »

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू

  मुंबई : मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच या बोटमधून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या …

Read More »

हलगा ग्रामपंचायत अध्यक्षावरील अविश्वास ठरावाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाकडून रद्द

    खानापूर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हलगा व चापगाव येथील ग्राम पंचायत अध्यक्षांवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली आहे त्यामुळे अविश्वास ठरावाचा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यासह चापगाव पंचायतीच्या अध्यक्षांवर अविश्वास …

Read More »

संकेश्वर स्थायी समिती सभापतीपदी प्रमोद होसमणी यांची निवड

  संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा व निधी मंजूर करण्यात आला. पालिकेतर्फे एससी एसटी विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापतीपदी म्हणून प्रमोद होसमणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी यांच्यावतीने होसमणी यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत …

Read More »

समिती शिष्टमंडळाने मांडल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सीमावासीयांच्या व्यथा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळ व कार्यकर्त्यांची नागपूर अधिवेशनच्या विधान भवन येथे चंदगडचे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांच्या समन्वयक मदतीने सर्व मंत्र्यांची गाठभेट देण्यात आली. प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सीमा भागातील अडचणी सांगण्यात आल्या व सीमा भागातील समन्वयकपदी बेळगावच्या जवळीक असलेल्या आमदारांना देण्यात यावी ही …

Read More »

खानापूर तालुक्याच्या विकासासाठी शंभर कोटी विशेष अनुदान जाहीर करा : आम. विठ्ठल हलगेकर यांची मागणी

    बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुका मोठा आहे. या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने शंभर कोटी रुपये विशेष अनुदान जाहीर करावे अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभेत बोलताना केली. उत्तर कर्नाटक विकास विषयावरील चर्चेत भाग घेताना आमदार हलगेकर पुढे म्हणाले, खानापूर तालुक्यातील जनतेला विविध समस्यांचा सामना करावा …

Read More »

मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने कडोलीत 25 डिसेंबरला कथाकथन

  कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कडोलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजवळील साहित्य संघाच्या कार्यालयात ही स्पर्धा होईल. स्पर्धेचे नियम व अटी अशा : 1) स्पर्धा शालेय गट …

Read More »