Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

शेतजमीन परस्पर हडप, तिघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा

  मदभावी येथील प्रकरण : बनावट कागदपत्रे तयार करत परस्पर 13 एकरवर जमीन लाटली बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून तिघा भावांची जमीन परस्पर नावावर करून घेत हडप केल्याप्रकरणी तिघा भावांवर गुन्हा दाखल झाला आहे. मदभावी (ता. अथणी) गावच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाची अथणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. गुन्हा …

Read More »

क्षयरोगमुक्त भारत निर्माण करूया : संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे

  क्षयरोगमुक्त भारत या केंद्र सरकारच्या मोहिमेची संजीवीनी फौंडेशन येथून सुरुवात बेळगाव : क्षयरोग निर्मूलनासाठी भारत सरकारने १०० दिवसांची “क्षयरोग मुक्त भारत’ ही मोहीम सुरू केली असून प्रत्येक भारतीयांने यात सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करून “क्षयरोगमुक्त भारत” निर्माण करूया असे उदगार संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे यांनी काढले. आरोग्य …

Read More »

अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, अभिनेत्याची तेलंगणा हायकोर्टात धाव

  हैदराबाद : तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आज नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अभिनेत्याने जामिनासाठी तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली आहे. ४ डिसेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका …

Read More »

नवजात बालिकेला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ; बालिकेचा मृत्यू

  बेळगाव : नवजात बालिकेला रुग्णालयात सोडून आईने पळ काढला आणि उपचार सुरू असलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना बेळगावातील बिम्स रुग्णालयात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, बैलहोंगल येथील बीबीजान सद्धाम हुसेन सय्यद या महिलेला ८ डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी एका मुलीला …

Read More »

बेळगाव लवकरच सुसज्ज पत्रकार भवनाची उभारणी : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : अनेक दिवसांपासून माध्यम प्रतिनिधींच्या इच्छेनुसार बेळगावात सुसज्ज प्रेस हाऊस बांधण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. आज शुक्रवारी (१२ डिसेंबर) येथील विश्वेश्वरय्या नगरमध्ये पत्रकार भवन आणि उद्यान विभाग कार्यालयाच्या इमारतींच्या पायाभरणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले, …

Read More »

चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांची कोवाड येथे भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आ. शिवाजी पाटील यांचा टक्केकर यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. आमदार शिवाजी पाटील यांच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा उल्लेख होता. निवडून आल्यानंतर आ. पाटील यांनी सीमाभागातील …

Read More »

सुळगा (हिं.) येथे श्री जोतिबा व काळभैरव मंदिराचे भूमिपूजन

सुळगा (हिं.) : कुलदैवतेला जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. शुभकार्यात कुलदैवतेला पहिला मान दिला जातो. बऱ्याच जणांना स्वतःचे कुलदैवत माहीत नसते. मात्र कुटुंबावर संकटे येतात त्यावेळी कुलदैवतेची आठवण होते. तेव्हा प्रत्येकाने स्वतःचे कुलदैवत जाणून घेणे महत्त्वाचे आहे,असे मत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा युवा नेते श्री. आर. एम. चौगुले …

Read More »

थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक

  हैदराबाद : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. …

Read More »

अंगणवाडी सेविका नियुक्तीचे बनावट आदेश : खानापूर ब्लॉक काँग्रेसकडून कारवाईची मागणी

  खानापूर तालुक्यातील पाली येथील एकाला अटक खानापूर : नुकताच झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या बदल्यात उमेदवाराकडून तीस हजार रुपये घेऊन चक्क नियुक्तीचे बनावट आदेशदेखील देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ब्लॉक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी झालेल्या …

Read More »

“भेकणे” परिवाराचा आधारवड हरपला!

  “जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणेच आमचे बंधू कै. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांची अचानक झालेली “एक्झिट” मनाला चटका लावून गेली. अगदी रात्रीपर्यंत आमच्या सर्वांशी गुजगोष्टी करणारे सकाळी अचानक आमच्यातून नाहीसे झाले. दि. 2 डिसेंबर 2024 रोजी श्री. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांना देवाज्ञा झाली. आज बारावा दिवस त्यानिमित्ताने…. …

Read More »