Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

नवनिर्मितीमुळे कल्पनाशक्तीला वाव : संमेलनाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी

  कुर्लीत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : विज्ञान आणि संस्कृतीची सांगड असल्यास त्यातून नवनिर्मिती होत असते. मानवाने विचार केल्यानेच विज्ञानाचा शोध लागला आहे. प्रश्नोत्तरामुळेच विज्ञानाची प्रगती होत आहे. त्यामध्ये नवनिर्मितीची ताकत असून कल्पनाशक्तीला वाव मिळू शकते. त्यासाठी विज्ञाननिष्ठ प्रयोगातून गुणवत्ता सिद्ध करा, असे आवाहन संमेलन अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

  बेळगाव : बेळगाव परिसरात अल्पवयीन मुलींवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि तिला त्वरित न्याय मिळावा यासाठी उद्या सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या अन्यायाविरोधातील लढ्यात सर्व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम …

Read More »

भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने रविवारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली. नितीन नबीन हे सध्या बिहारच्या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. नितीन नबीन आता जेपी नड्डा यांची जागा सांभाळतील. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी त्यांच्या …

Read More »

डॉ. अंजलीताईंच्या सेवाभावी वृत्तीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून कौतुक

  बेंगळूर : गोवा – दिल्ली विमानप्रवासादरम्यान आपत्कालीन सीपीआर करून एका अमेरिकन महिलेचा जीव वाचवणाऱ्या खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर कौतुक केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्याची दखल घेतली. वैद्यकीय व्यवसायातून राजकारणात सक्रिय असतानाही, योग्य …

Read More »

वंदे शासनम चॅलेंजर्स क्रिकेट संघ ‘जैन प्रीमियर लीग २०२५’ चा मानकरी

  निपाणी (वार्ता) : येथील सॅटर्डे टर्फ क्रिकेट ग्रुप आयोजित जैन प्रिमियर लीग- २०२५ क्रिकेट स्पर्धा भाटले टर्फ येथे पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्बन टस्कर्स आणि वंदे शासनम चॅलेंजर्स यांच्यात अटी तटीची लढत झाली त्यामध्ये वंदे शासनम चॅलेंजर्स क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला २१ …

Read More »

रणझुंझार हायस्कूलमध्ये कै. वामनराव मोदगेकर व्याख्यानमालेचा शुभारंभ

  निलजी : रणझुंझार शिक्षण संस्था संचलित रणझुंझार हायस्कूल, निलजी येथे रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या सौजन्याने कै. वामनराव मोदगेकर स्मृतीदिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन श्री. रमेशराव वामनराव …

Read More »

मेथी घ्या, पोकळा घ्या, फळे आलेत, केळी आलेत…

  बोरगावमध्ये विद्यार्थ्यांनी भरावला आठवडी बाजार : विद्यासागर शिक्षण संस्थेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : ‘मेथी, पोकळा, भाजी, कोथिंबीर, दोडके, वांगी, गवार, घ्या, आले, लसूण, कांदे घ्या, इकडे रताळे आलेत, फळे घ्या, केळी घ्या अशा नानाविध भाजीपाल्यांच्या आरोळ्यांनी बोरगाव येथील विद्यासागर संस्थेचे पटांगण गजबजुन गेले होते. संस्थेने भरविलेल्या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी …

Read More »

पोलिस होमगार्डवर वाहन धडक प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : ट्रॅफिक पोलिस व होमगार्ड आपले कर्तव्य बजावत असताना, सदर आरोपींनी वन-वे रस्त्यावर रॉंग साईडने स्कूटर चालवून पोलिस व होमगार्डला वाहनाचा धक्का देऊन खाली पाडले. त्यात त्यांना जखमी करून, त्यांचे शर्ट धरून धक्काबुक्की केली तसेच अर्वाच्च शिवीगाळ करून कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता …

Read More »

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांवर पतीने पेट्रोल ओतून त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्न अथणी तालुक्यातील तेलसंग गावात उशिरा उघडकीस आली आहे. १० डिसेंबर रोजी पती भीमा भोसले याने आपल्या पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना मारण्याचा करण्याचा प्रयत्न केला. भीमा हा …

Read More »

आरोपी मुख्याध्यापकास कठोर शिक्षा द्या; कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकावर अनेक विद्यार्थिनींसोबत अनुचित वर्तन केल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, प्रकरण उघडकीस येताच पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. शाळा …

Read More »