संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम गणपती भूसगोळ यांनी बाजी मारली असून काँग्रेसच्या उमेदवार भारती मरडी यांना 345 तर अपक्ष उमेदवार गंगाराम भुसगोळ यांना 448 मते पडली. गंगाराम गणपती भूसगोळ यांनी काँग्रेसच्या श्रीमती भारती जितेंद्र मरडी यांचा 130 मतांनी पराभव करून विजयी …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने साक्षरता जनजागृती
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने मराठी प्राथमिक शाळा मन्नूर येथे साक्षरता जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हातात साक्षरतेचे फलक घेऊन जनजागृती रॅलीने सुरुवात केली आणि शिवाजी चौकात रॅलीची सांगता झाली. आरसीबी दर्पणच्या अध्यक्षा Rtn. रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि साक्षरता जागृती मोहिमेचा …
Read More »राज्यातील ९३ सरकारी शाळात इंग्रजी माध्यम सुरू करण्यास मान्यता
बंगळूर : पालकांच्या मागणीनंतर, राज्य सरकारने ९३ कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये (केपीएसईएस) इंग्रजी माध्यमाचे विभाग सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. या अतिरिक्त विभागांसाठीचा खर्च २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या शाळांच्या विकासासाठी राखून ठेवलेल्या अनुदानातून केला जाईल. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (डीएसईएल) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या शाळांमध्ये २०२५-२६ पासून …
Read More »भाजपच्या यत्नाळ गटाकडून वक्फविरोधी मोहीमेला चालना
प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना जोरदार झटका बंगळूर : भाजपचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाने आजपासून सीमावर्ती बिदर जिल्ह्यात पाच जिल्ह्यांमध्ये वक्फविरोधात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ‘वक्फ हटाओ भारत देश बचाओ’ या घोषणेखाली संघर्ष सुरू झाला. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपचा दारुण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर …
Read More »सरकारी मराठी शाळा शिवाजीनगर खानापूर येथील शिक्षकाची बदली रद्द करण्याबाबत खानापूर समितीच्या वतीने निवेदन
खानापूर : सरकारी मराठी शाळा शिवाजीनगर खानापूर येथील शिक्षकाची नियोजन पर बदली रद्द करण्याबाबत आज महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सरकारी मराठी प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथे एकूण 17 मुले शिक्षण घेत आहेत. नियमाप्रमाणे दोन मराठी व एक कन्नड शिक्षक पहिली ते पाचवी वर्गात कार्यरत आहेत असे …
Read More »निपाणीतील मराठा समाजाचा वधू-वर मेळाव्यात ३०० जणांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : येथील शुभकार्य वधू-वर सूचक केंद्रातर्फे येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात राज्यव्यापी सकल मराठा समाज वधू- वर परिचय मेळावा पार पडला. त्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला. प्रारंभी दादासाहेब खोत यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात …
Read More »जीएसएस महाविद्यालयाच्या 50 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा पुनर्मिलन महामेळावा
बेळगाव : येथील जीएसएस महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. व्यवस्थापन, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी ही गौरवाची बाब आहे. याबाबतची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने 28 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर “सक्सेरियंस २४ रीकनेक्ट अँड रिजोईस” हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती …
Read More »महात्मा फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा
बेळगाव : आद्य समाजसुधारक, स्त्रियांचा पालनहार, क्षुद्राती शुद्रांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे आंतरशालेय क्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये द. म. शि. मंडळाच्या सर्व शाळांच्या प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच बेळगाव आणि परिसरातील मराठी …
Read More »बाग परिवारातर्फे कवितांचे बहारदार सादरीकरण
बेळगाव : बाग परिवारचा नोव्हेंबर महिन्यातील कार्यक्रम रविवार दिनांक 24 रोजी बसवेश्वर गार्डन गोवावेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सौ. अस्मिता आळतेकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयुष्याचा जोडीदार, लगीनघाई, हिवाळा अशा विविध विषयांवरील सुंदर कवितांचे बहारदार सादरीकरण उपस्थित कवी – कवयित्रींनी मोठ्या उत्साहाने केले. पावसाळ्यानंतर प्रथमच कार्यक्रम …
Read More »बेळगावातील श्री ज्योतिबा मंदिर उजळले ११ हजार दिव्यांनी…
बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात दरवर्षी कार्तिक दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदाही या दीपोत्सवाने मंदिराचा परिसर प्रकाशमय करून टाकला. ११ हजार दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसराने एक नव्या तेजाने भरून गेला होता. या निमित्ताने मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध रंगांनी भरलेल्या रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta