Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

पोलीस आयुक्तांसह ११ अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची वाल्मीकी समाजाची मागणी

  बेळगाव : बंगळूरु येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी बंगळूरुचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह ११ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सरकारच्या आदेशाचा निषेध करत आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाल्मीकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. बंगळूरु चेंगराचेंगरीच्या घटनेची नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारण्याऐवजी, ती पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी बोलताना, वाल्मीकी …

Read More »

मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्यापासून; मनोरंजनासाठी पाळणे व खेळण्याची दुकाने सज्ज

  खानापूर : मऱ्याम्मा देवीचा वार्षिक उत्सव उद्या मंगळवार दिनांक 10 व बुधवार दिनांक 11 जून असे दोन दिवस चालणार आहे. या अगोदर गावात चार मंगळवार पाळण्यात आले. हा पाचवा मंगळवार मूर्ग नक्षत्र सुरू झाल्यावर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी देवीची यात्रा भरते. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून मंदिरासमोर मंडप घालण्यात …

Read More »

भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने पार पडला विवाह!

  बेळगाव : धार्मिक रीतीरिवाजांना फाटा देऊन भारतीय संविधानाच्या प्रतिज्ञेने शहरात एक अभिनव व ऐतिहासिक विवाह सोहळा संपन्न झाला. शहरातील प्रसिद्ध दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगले यांच्या कनिष्ठ पुत्राचा विवाह संविधानाची शपथ घेऊन पार पडला, ज्याने सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात चर्चेला सुरुवात झाली आहे. ऍड. विशाल चौगले (वर) …

Read More »

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण; आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव

  बंगळुरु : आरसीबी संघाच्या विजयोत्सवाचा जल्लोष करण्यासाठी 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात लाखोंच्या संख्येत चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा दुर्देवी अंत झाला. तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल …

Read More »

ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जींची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह आणि जवानांसह शांताई सेकंड होम या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. वृद्धाश्रमातील आजीबाईंनी ब्रिगेडिअर मुखर्जींचे पारंपरिक आरतीने उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. वृद्धाश्रमातील हिरवळ, स्वच्छ परिसर आणि आनंदी वातावरण पाहून ते …

Read More »

आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कारला अपघात…

  अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील दरूरजवळ माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कार आणि मालवाहू वाहनामध्ये अपघात झाला. लक्ष्मण सवदी हे अथणीहून गोकाक मार्गे बंगळुरूला जात होते. यावेळी त्यांच्या कारला एका मालवाहू वाहनाची धडक झाली. सुदैवाने लक्ष्मण सवदी धोक्यातून बचावले. अपघातानंतर लक्ष्मण सवदी दुसऱ्या कारने बंगळुरूला निघाल्याचे कळते. …

Read More »

शेतकऱ्यांनी बांधलेल्या रस्त्यावर अडथळा : संतप्त शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या कलारकोप्प येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी स्वतः तयार केलेल्या रस्त्यावर एका व्यक्तीने अडथळा निर्माण केल्याने त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हिरेबागेवाडी गावाच्या हद्दीतील कलारकोप्पचे …

Read More »

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे एशियन स्पर्धेसाठी निवड झालेल्या देवेन बामणेचा सत्कार

  बेळगाव : सप्टेंबर महिन्यात कोरिया येथे होणाऱ्या एशियन रोलर स्केटिंग स्पर्धेत भारतीय संघात निवड झालेल्या बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर देवेन बामणे याचा कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार कर्नाटक राज्याचे क्रीडा अधिकारी श्री. चेतन आर. आय पी एस यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी …

Read More »

पुष्पक एक्सप्रेसमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू, रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह

  मुंबई : पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडलील आहे. ज्यामुळे रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह पसरल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी ८:२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून निघालेल्या या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. …

Read More »

राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पत्नी सोनमला अटक

  मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या बेपत्ता हनिमून जोडपे प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणात पत्नी सोनम आणि तिच्या ३ साथीदारांना अटक करण्यात आले आहे. मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रघुवंशी बेपत्ता प्रकरणात दररोज नवनवे ट्विस्ट समोर येत होते, मात्र आता या प्रकरणात पत्नीचाच हात असल्याचा धक्कादायक खुलासा …

Read More »